Saturday, May 30, 2026
Sports

धनंजय भिंताडे याला राष्ट्रीय कुराश स्पर्धेत रौप्य पदक

पुणे : राष्ट्रीय सिनियर कुराश स्पर्धेचे आयोजन पंचमढी मध्यप्रदेश येथे करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत धनकवडी येथील धनंजय तात्यासाहेब भिंताडे याने खुल्या वजनी गटात चमकदार कामगिरी करीत रौप्यपदक पटकाविले. अंतिम फेरीत त्याने हरियाणाच्या खेळाडूला हरविले. 

धनंजयच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आशियाई स्पर्धेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत एक प्रबळ स्पर्धक म्हणून पुढे आला आहे. महाराष्ट्र कुराश असोसिएशनचे सचिव शिवाजी साळुंखे, अनुप नाईक यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले. कुराश असोसिएशन आॅफ इंडियाचे सचिव रवी कपूर यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
निलेश भिंताडे स्पोर्ट्स फौंडेशनचे मार्गदर्शक तात्यासाहेब भिंताडे यांनी  विजयी खेळाडू, सर्व संघ सहकारी, व्यवस्थापक यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading