Saturday, May 30, 2026
PUNE

शिवजयंती निमित्त घरातील मातृशक्तीला शिवमूर्ती भेट

पुणे : छत्रपती शिवरायांना जिजाऊंनी घडविले. असेच कर्तृत्व गाजविणारे व्यक्तिमत्त्व प्रत्येक घरात घडावे यासाठी गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्या वतीने घरोघरी जाऊन घरातील मातृशक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्यात आली. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप या उक्तीप्रमाणे शिवरायांचे आताच्या पिढीला कायम स्मरण रहावे म्हणून शिवमूर्ती देण्यात आल्या. शहराच्या पूर्व भागात ५०० मूर्तींचे वाटप करण्यात येत आहे. 
सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त उपक्रम राबविण्यात आला. शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात या उपक्रमांतर्गत इस्कॉनचे उपाध्यक्ष संजय भोसले यांच्या हस्ते शिवमूर्ती देण्यात आल्या. यावेळी प्रभात मित्र मंडळाचे किशोर चव्हाण, विजय चौधरी उपस्थित होते. 
संजय भोसले म्हणाले, छत्रपती शिवराय हे फक्त युग पुरुष नसून एक तत्व पुरुष होते आणि त्यांची तत्वे आपण आपल्या जीवनात उतरवली पाहिजेत. 

किशोर चव्हाण म्हणाले,शिवरायांचे कार्य येणाºया प्रत्येक पिढीला कळावे. यासाठी प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या गोष्टी घरातील लहान मुलांना सांगाव्यात जेणेकरुन मुले आभासी जगातून बाहेर येतील आणि  राष्ट्रासाठी शिवरायांसारखे काम करण्याची प्रेरणा त्यांना मिळेल. 

विजय चौधरी म्हणाले, आपल्या देव्हाºयात शिवरायांची इतर देवांप्रमाणे रोज पूजा केली जावी तोच खरा त्यांना मानाचा मुजरा असेल. शिवरायांचे कर्तृत्त्व या माध्यमातून नविन पिढीला समजेल. ज्या प्रमाणे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो त्या प्रमाणे दरवर्षी तिथी प्रमाणे येणारी शिवजयंती प्रत्येक घरात साजरी केली जावी. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading