Saturday, May 30, 2026
PUNE

आनंदऋषीजी २९ व्या पुण्यस्मृती निमित्त अन्न-चारा दान करून सेवादिन उत्साहात

पुणेः राष्ट्रसंत आचार्यसम्राट परमपूज्य १००८ श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या २९ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त ऋषी आनंदवन, पुणेतर्फे सेवा दिन साजरा करण्यात आला. पुण्यस्मृती दिनानिमित्त दुर्गम भागातील गोशाळा विरगाव अकोले येथील शंभर गायांच्या चाऱ्यासाठी साहाय्य करण्यात आले.

परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने हे कार्य करण्यात आले. सेवाधाम वृद्धाश्रम डोणजे गांव, सिंहगड येथील २५ नाना-नानीना पुरणपोळीचे भोजन देण्यात आले. त्याचप्रमाणे सरस्वती अनाथ आश्रम दापोडी यांना तेल, गुळ, दाळी, पोहे, साखर आदी किराणा व धान्य साहित्य देण्यात आले. या सेवादिनाचे आयोजन ऋषी आनंदवन पुणे व महावीर फुड बॅंक पुणेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading