प्रसिद्ध गायिका वैशाली माडेला वेध ‘घडयाळा’चे

मुंबई – प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली माडेने तिच्या गोड आवाजात सर्वांच्या मनात घर केलं. आता वैशाली राजकारणाकडे वळणार आहे. ती लवकरचं  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरणार आहे. वैशाली 31 मार्च रोजी मुंबईच्या एनसीपी कार्यालयात खासदार सुप्रिया  सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. वैशाली एनसीपीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सांस्कृतिक विभाग प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब  पाटील यांनी दिली आहे. 

काही दिवसांपूर्वीचं अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता वैशाली देखील राजकाणाकडे तिचा मोर्चा वळवणार आहे. अशा परिस्थितीत असं लक्षात येत आहे,की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या तयारीत आहे. 

वैशाली बद्दल सांगायचं झालं तर मराठी सिनेसृष्टीत वैशाली एक प्रसिद्ध कलाकार आहे. तिची लोकप्रियता  पाहता एनसीपीने वैशालीला पक्षात बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. वैशालीने फिल्म इडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं असून हा प्रवास तिच्यासाठी फार जिरकीचा होता. 

संजय लिला भंसाळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील ‘पिंगा’ हे गाणं वैशालीच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आलं. या  गाण्यालातर लोकांनी डोक्यावर धरलं. त्यानंतर वैशालीला आपण बिग बॉसच्या घरात  देखील पाहिलं. पण बिग बॉसच्या घरात फार कमी दिवस ती राहिली. आता वैशाली राजकारणात प्रवेश करणार आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: