कोरोना – राज्यात सोमवारी ३१ हजार ६४३ नवे रुग्ण तर १०२ बाधितांचा मृत्यू
मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. त्यातच, आज ३१ हजार ६४३ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. कालपेक्षा हा आकडा कमी असला तरीही अद्यापही धोका कमी झालेला नाही.
गेल्या २४ तासांत ३१ हजार ६४३ नव्या रुग्णांची वाढ झाली तर १०२ मृतांची नोंद झाली. तर, दिवसभरात २० हजार ८५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत २७ लाख ४५ हजार ५१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, ५४ हजार २८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ३६ हजार ५८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ठाण्यात ९८४ रुग्ण तर कल्याण डोंबिवलीत ९४१ रुग्णांची वाढ झाली आहे. नागपूरमध्ये ३ हजार १७७ रुग्णांची वाढ झाली आहे.
पुणे शहर
- दिवसभरात २५४७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात २७७१ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ३२ रुग्णांचा मृत्यू. ८ रूग्ण पुण्याबाहेरील.
- ६७४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २६१६५९.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३२८७५.
- एकूण मृत्यू -५२४३.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २२३५४१. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १५१५३.
