PMP ला ६ व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पो २०२१ मध्ये ‘अर्बन मोबिलिटी’ पुरस्कार

पुणे, दि. 27 – नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ६ व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पो २०२१ मध्ये पीएमपीएमएल ला अर्बन मोबिलिटी प्रकारातून प्रतिष्ठेचा पुरस्कार स्मार्ट सिटीशी संबंधित विविध बाबींवर व्यापार मेळा व परिषद असे स्वरूप असलेला व सन २०१५ मध्ये सुरू झालेला स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पो आता आशिया खंडातील सर्वात मोठा व्यापार मेळा आणि परिषद म्हणून विकसित झालेला आहे. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन ( आयटीपीओ ) आणि एक्झिबिशन इंडिया ग्रुपच्या वतीने नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर नुकताच ६ वा स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पो २०२१ आयोजित करण्यात आला होता. २४ मार्च २०२१ ते २६ मार्च २०२१ दरम्यान या दिमाखदार एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते. २६ मार्च २०२१ रोजी या एक्स्पो मध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पीएमपीएमएल च्या नामांकनाला “अर्बन मोबिलिटी” प्रकारातून पुरस्कार मिळाला.

देशभरातील विविध स्मार्ट सिटीज,अर्बन लोकल बॉडीज व ट्रान्सपोर्टेशन युनिट्स कडून स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पो २०२१ मध्ये मोठ्या संख्येने दाखल झालेल्या नामांकानांमधून पीएमपीएमएल च्या नामांकनाची अर्बन मोबिलिटी प्रकारातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली. पीएमपीएमएल च्या वतीने पीएमपीएमएल च्या सहव्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. चेतना केरुरे यांनी दिल्ली येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास बिहार राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री मा. श्री. जिबेश कुमार यांच्यासह केंद्र सरकार व राज्य सरकारांमधील अनेक प्रतिष्ठित सन्माननीय मान्यवर अतिथीगण उपस्थित होते.

पीएमपीएमएल च्या प्रगतीबद्दल व होत असलेल्या सुधारणांबद्दल बोलताना पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा.डॉ.राजेंद्र जगताप म्हणाले,” पीएमपीएमएल चे उत्पन्न व रायडरशिप वाढावी यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांमध्ये आम्ही आघाडीवर आहोत. यामध्ये नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने व शहराच्या कानाकोपऱ्यात पीएमपीएमएल ची सेवा पोहोचविण्यासाठी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी संकल्पनेतून अत्यंत किफायतशीर दरात सुरू केलेली अटल बससेवा आहेच. शिवाय पीएमपीएमएल च्या ताफ्यात सध्या उपलब्ध असलेल्या १५० स्मार्ट एसी पर्यावरणपूरक ई बसेस द्वारे काही नाविन्यपूर्ण सेवा सुरू केलेल्या आहेत. पुणे विमानतळावरून सुरू केलेली अभि बससेवा, लिमिटेड बस स्टॉप सेवा या त्यातलाच एक भाग आहेत. तसेच पीएमपीएमएल च्या ताफ्यात पुढील काळात दाखल होणाऱ्या आणखी ५०० स्मार्ट एसी पर्यावरणपूरक ई बसेस द्वारे विविध नाविन्यपूर्ण सेवा देण्याचा आमचा मानस आहे. याबरोबरच काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करून पीएमपीएमएल च्या प्रगतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुरस्काराबद्दल बोलताना डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले हा पुरस्कार म्हणजे पीएमपीएमएल मधील टीमवर्कला मिळालेली अजून एक मान्यता असून हा पुरस्कार आम्हाला आणखी कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करेल.

Leave a Reply

%d bloggers like this: