‘यूनियन बँक’ व ‘एचपीसीएल’ यांच्यातर्फे ‘को-ब्रॅंडेड कॉन्टॅक्टलेस रुपे क्रेडिट कार्ड’ सादर
मुंबई, दि. 26 – भारत सरकारच्या मालकीच्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेली यूनियन बँक ऑफ इंडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज व ‘महारत्न’ श्रेणीतील कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, यांनी एक ‘को-ब्रॅंडेड कॉन्टॅक्टलेस रुपे क्रेडिट कार्ड’ सादर करीत असल्याची घोषणा केली आहे. हे कार्ड वापरणाऱ्यांनी 500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे इंधन ‘एचपीसीएल’च्या देशभरातील 18 हजारांपैकी कोणत्याही पंपावर खरेदी केले, तर त्यांना ‘16 एक्स’ रिवॉर्ड पॉइंट्स (बक्षीस गुण) मिळतील, जे 4 टक्के कॅशबॅकच्या समतुल्य असतील. ‘एचपीएल पे वॉलेट’द्वारे इंधनासाठी पैसे भरल्यास ग्राहकांना ‘एचपीसीएल’कडून दीड टक्का अतिरिक्त बक्षीस गुणदेखील मिळतील. ‘एचपीसीएल’च्या रिटेल पंपांवर इंधन खरेदीवर एक टक्का इंधन अधिभार माफीचा लाभही ग्राहकांना मिळेल.
हे कार्ड सादर करण्याचा सोहळा व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात आला. ‘एचपीसीएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश कुमार सुराणा, ‘यूनियन बॅंक ऑफ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण राय जी., ‘एनपीसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे, ‘एचपीसीएल’चे विपणन संचालक राकेश मिस्री, ‘एचपीसीएल’चे रिटेल विभागाचे कार्यकारी संचालक एस. के. सुरी, यूनियन बॅंकेचे कार्यकारी संचालक दिनेशकुमार गर्ग, ‘एनपीसीआय’च्या मुख्य कार्यान्वयीन अधिकारी प्रविणा राय आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) या वैशिष्ट्यासह प्रथमच को-ब्रॅंडेड रुपे क्रेडिट कार्ड बाजारात आणले जात आहे. त्यामुळे मेट्रो, बस, टॅक्सी, उपनगरी रेल्वे, टोल व फास्टॅग टॉपिंगअप, पार्किंग आणि किरकोळ खरेदी, अशा प्रवासातील सर्व बाबींसाठी संपर्कविरहीत व्यवहार करणे ग्राहकांना शक्य होणार आहे. एकापेक्षा जास्त कार्डे वापरण्याची आवश्यकता संपून एकाच कार्डचा वापर सर्व गरजांसाठी करता येणार आहे.
‘यूबीआय-एचपीसीएल कॉन्टॅक्टलेस रुपे कार्ड’ वापरकर्त्यांचे स्वागत म्हणून त्यांना 300 रुपयांचा एक ‘वेलकम बोनस’ देण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांना ‘एचपीसीएल’च्या कोणत्याही रिटेल पंपावर इंधन खरेदी करण्यासाठी वापरता येईल. कार्ड कार्यान्वित झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत त्यांना हा लाभ घेता येणार आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांनी कार्ड जारी करण्याच्या पहिल्या महिन्यात 5 हजार रुपयांचे इंधन घेतल्यास, ‘कार्ड अॅक्टिव्हेशन बोनस’साठी ग्राहक पात्र ठरतील आणि त्यांना एखाद्या नामांकीत ब्रॅंडचे ‘शॉपिंग व्हाऊचर’ मिळू शकेल.
‘यूबीआय-एचपीसीएल रुपे कॉन्टॅक्टलेस कार्ड’ घेताना ग्राहकांना नाममात्र शुल्क भरावे लागेल. या कार्डावर इंधनेतर श्रेणीतील विविध सवलती व लाभही देण्यात येत आहेत. यामध्ये करमणूक, जीवनशैली, प्रवास, खरेदी, फूड डिलिव्हरी आणि तत्सम श्रेणीतील लाभांचा समावेश आहे. इंधनेतर खरेदीसाठी या कार्डातून ग्राहकांना 2 एक्स बक्षीस गुण मिळतील. याव्यतिरिक्त, एका वर्षात 1.25 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतींची इंधनेतर खरेदी केल्यास, वापरकर्त्यांना 500 गुणांची ‘इन्क्रीमेंटल माईलस्टोन रिवॉर्ड्स’ मिळतील, तसेच पुढील प्रत्येक 25 हजार रुपयांच्या खर्चावर 100 अतिरिक्त गुण मिळतील. दोन लाखांच्या पलिकडे 50 हजार रुपयांच्या प्रत्येक इंधनेतर खरेदीवर, ग्राहकांना अतिरिक्त 1 हजार बक्षीस गुण मिळतील.
‘एचपीसीएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेशकुमार सुराणा म्हणाले, “ग्राहकांची सुविधा वाढविण्यासाठी नवीन सुविधा असलेले को-ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी यूनियन बँक ऑफ इंडिया आणि ‘एनपीसीआय’सह भागीदारी केल्याने ‘एचपीसीएल’ला खूप आनंद झाला आहे. “नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड” वैशिष्ट्यांसह चालणारे हे पहिले को-ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड आहे. मेट्रो प्रवास, बस प्रवास, पार्किंग फी, फास्टॅग इत्यादींसाठी ते वापरता येईल. वापरण्यास मदत करेल. क्रेडिट कार्डच्या सर्व वैशिष्ट्यांसह यामध्ये अनेक लाभ व बक्षिसे देण्यात येत आहेत.’’
‘यूनियन बँक ऑफ इंडिया’चे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज किरण. म्हणाले, “’यूनियन बँक-एचपीसीएल को-ब्रॅंडेड क्रेडिट कार्ड’ ‘रुपे प्लॅटफॉर्म’वर आम्ही बाजारात आणत आहोत, हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. इंधनाच्या रिटेल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘एचपीसीएल’शी आणि भारताचे ‘ग्लोबल कार्ड पेमेंट नेटवर्क’ असलेल्या ‘रुपे’शी आमची भागीदारी झाल्याने, ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.”
ग्राहक केंद्रीत डिझायनिंग उत्पादने आणि जीवन-सुलभता वाढविणारी प्रक्रिया यांबाबत यूनियन बँक ऑफ इंडिया कटिबद्ध आहे. देशातील मेट्रो आणि बिगर-मेट्रो शहरांमध्ये इंधनाचा वापर वाढला आहे. देशभरातील प्रत्येक राज्यात आमच्या शाखांचे नेटवर्क आहे. तेथील ग्राहकांना या नव्या उत्पादनामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात फायदा होईल. हे ‘को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड’ आमच्या ग्राहकांसाठी अनोखी बक्षिसे आणि लाभ घेऊन आले आहे. ‘एचपीसीएल’च्या रिटेल आऊटलेट्समध्ये हे कार्ड वापरताना कॅशबॅक लाभाव्यतिरिक्त, इंधन अधिभारही माफ होतो. कार्डधारकाला 10 लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षणही यातून मिळते.
