मनसेची सभासद नोंदणी सायकलवरून
पुणे – “सायकलींचे शहर” म्हणून ओळख असणाऱ्या पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडगावशेरी मतदार संघाच्या वतीने पक्षाच्या सभासद नोंदणीसाठी “मनसेचे सभासद व्हा” या कार्यक्रमा अंतर्गत येरवड्यात मनसेच्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी सायकलवरुन नोंदणी मोहिमेला सुरुवात केली.
मनसेचे राज्य कार्यकारणी सदस्य माजी नगरसेवक राजेंद्र वागस्कर , शहरअध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे, पुणे शहर संघटक सादिकभाई शेख, वडगाव शेरी विभाग अध्यक्ष सुनिल कदम व इतर सर्व पदाधिकारी यांनी सायकल चालवून सभासद नोंदणीस आरंभ केला. सर्वसामान्यांपर्यंत सायकलवरून पोहोचून पक्षाची नोंदणी करण्याचा मानस असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक वडगाव शेरी विभाग प्रमुख सुनील कदम यांनी दिली. या उपक्रमाला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मनसेचे हेमंत बत्ते , अनिल साळुंखे , किशोर चिंतामणी , रुपेश घोलप, वंदनाताई साळवी, रमेश जाधव , महेश शिर्के, दत्ता माळी, बाळासाहेब अहिवळे,प्रविण मिसाळ, किर्ती मचारेकर,मनोज ठोकळ, जेमा चव्हाण,कृष्णा मोहिते, सागर खंडवे, बाळासाहेब शिंगाडे, जय जगताप, कैलास पौडमल, संकेत शिंदे, शाम ताठे, निशिकांत चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
