PMP स्मार्ट होण्यास सज्ज

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम गांभीर्याने घेण्याची गरज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाहिनी रेडिओ स्टेशन यांच्यामार्फत स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पीएमपीएमएल कडून कोणते बदल केले जात आहेत व लॉक डाऊन काळात कोरोना प्रतिबंधासाठी पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी बजावलेली भूमिका व सध्या कोरोना प्रतिबंधासाठी पीएमपीएमएल कडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आदी विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात पीएमपीएमएल कर्मचारी व प्रवाशांनी सहभाग घेतला. पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. श्रुती तांबे व समाजशास्त्र विभागाचे रिसर्च ऑफिसर प्रा. विष्णू शिंदे यांनी पीएमपीएमएल कर्मचारी व प्रवाशांना प्रश्न विचारून त्यांची मते जाणून घेतली. परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ यांनीही या चर्चासत्रात सहभाग नोंदवून त्यांची परखड मते व्यक्त केली.
पीएमपीएमएल चे कात्रज आगारातील कायम चालक अभिजीत श्रीपत पांचाळ चालक क्र. २४७१, कायम चालक संतोष नामदेव सुतार चालक क्र.२८१८ व कोथरूड आगारातील कायम चालक प्रकाश कोंडीबा कुरकुटे चालक क्र. २१२३ यांनी चर्चासत्रात भाग घेतला. सदर चर्चासत्राचा तपशील खालीलप्रमाणे

प्रश्न – स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पीएमपीएमएल कडून कोणती तयारी केली जात आहे?
उत्तर –
◆पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी सध्या पीएमपीएमएल च्या ताफ्यात १५० स्मार्ट एसी ई बस आहेत व आणखी ५०० स्मार्ट एसी ई बस पीएमपीएमएल च्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तसेच ताफ्यात असलेल्या सीएनजी बसदेखील पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील प्रदूषणाला आळा घालण्यास उपयुक्त भूमिका बजावत आहेत.

◆याचबरोबर बसमध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल बोर्ड, बस ट्रॅक होण्यासाठी जीपीएस मशीन व ई तिकीट मशीन या सर्व बाबी पीएमपीएमएलला स्मार्ट सिटीचा अविभाज्य भाग बनवत आहेत.

◆पीएमपीएमएल ने विकसित केलेल्या अँप मुळे बसेसची माहिती प्रवाशांना घरबसल्या मिळू शकते. ऑनलाईन तक्रार नोंदवता येते. आता या अँपवर मराठी भाषेतूनही तक्रार नोंदवता येते. त्यामुळे तक्रारीचे निराकरण करणे सोयीचे झाले आहे.

◆यापूर्वी संबंधित डेपोकडूनच ब्रेकडाऊन बसची दुरुस्ती होत होती. परंतु आता ब्रेकडाऊन बसच्या ठिकाणापासून नजीक असणाऱ्या डेपोकडून बसची दुरुस्ती होते. यामुळे आता ब्रेकडाऊन होणाऱ्या बसला मार्गावर येण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत झाली आहे.

◆कार्गो एफएल अँप मुळे कर्मचाऱ्यांना त्यांची पेमेंट स्लिप डिजिटल स्वरूपात एका क्लिक वर मिळू लागली आहे. यामुळे पीएमपीएमएल ची पेपरलेस कामकाजाकडे वाटचाल सुरू झाली आहे.

प्रश्न- लॉक डाऊन काळात कोरोना प्रतिबंधासाठी पीएमपीएमएल च्या योगदानाचे स्वरूप कसे होते?
उत्तर-
◆पीएमपीएमएल कडील ४०८५ कर्मचारी कोरोना ड्युटीसाठी महापालिकेकडे वर्ग करण्यात आले होते. रुग्णवाहिका चालक, कचरा डेपोच्या वाहनांवरती चालक म्हणून तसेच पॉझिटिव्ह पेशंटसना कोरोना चाचणी केंद्रांपासून क्वारंटाईन सेंटर पर्यंत पीएमपीएमएल च्या बसेस मधून नेण्याची जोखमीची जबाबदारी देखील पीएमपीएमएल चालकांनी पार पाडली. यासाठी मोफत २०० बसेस पुरविण्यात आल्या होत्या.

◆लॉक डाऊन काळात मार्गावर असणाऱ्या चालक/वाहकांनी सर्वसामान्य लोकांनादेखील कोविड व्यतिरिक्त इतर सुविधा मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. (उदा. गरोदर स्त्रिया)

◆सर्व्हे (ऑक्सिजन लेव्हल ) करण्यासाठी पीएमपीएमएल चे कर्मचारी नेमण्यात आले होते.

प्रश्न- सध्या कोरोनापासून संरक्षणासाठी बसेसमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?
उत्तर-
◆प्रत्येक बसमध्ये सॅनिटायझर बॉटल स्टँडसह लावण्यात आली आहे. जेणेकरून प्रवाशांना सॅनिटायझर चा वापर करता यावा.

◆५०% क्षमतेने प्रवाशी वाहतुकीसाठी बसमध्ये सीटवर कोठे बसावे व कोठे बसू नये याच्याही खुणा करण्यात आल्या आहेत.

◆चालक व वाहक यांना हँड ग्लोव्हज, मास्क व फेसशिल्ड देण्यात आले.

◆प्रत्येक थांब्यावर वाहतूक नियंत्रक प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग,मास्क,सॅनिटायझर च्या वापराबाबत सूचना देत होते व अजूनही देत आहेत.

◆प्रत्येक बस सॅनिटाईझ केली जात होती व सध्याही केली जाते.

◆वाहक व चालक यांच्याकडून प्रवाशांना एकाच बसमध्ये गर्दी न करण्याची विनंती केली जाते. मात्र पीक अवर्स मध्ये सर्वांनाच कामाच्या ठिकाणी पोहोचणे गरजेचे असल्याने प्रवाशी वाहक व चालकांच्या विनंतीला फारसा प्रतिसाद देत नाहीत.

प्रवाशांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

◆पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली ‘अटल बससेवा’, पीएमआरडीए हद्दीतील ग्रामीण भागात सुरू केलेले नवीन बसमार्ग या सेवांचे प्रवाशांनी कौतुक केले.

◆७० रुपयांचा डेली पास अत्यंत फायद्याचा आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातही प्रवास करता येतो.

◆पीक अवर्स मध्ये बसेसची फ्रिक्वेन्सी वाढवावी. जेणेकरून बसेसमध्ये गर्दी होणार नाही.

◆विद्यार्थ्यांकडून पीएमपीएमएल च्या वाहक व चालकांसाठी त्यांच्या कामाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया.

◆पीएमपीएमएल ची चांगली सेवा अशीच मिळत रहावी अशी आशा व्यक्त केली आणि मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांचे मनापासून आभार मानले.

आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले सर्व नियम पाळले व ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यासाठी गांभीर्याने सहकार्य केले तर कोरोना विरुद्धचा लढा आपण नक्कीच जिंकू शकतो, असा विश्वास चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्वांनीच व्यक्त केला.

Leave a Reply

%d bloggers like this: