बार्टीतर्फे ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन
पुणे, प्रतिनिधी: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेतर्फे 18 मार्च 2021 पासून एमपीएससी मुख्य (Mains) परिक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहे. यामध्ये एमपीएससी मुख्य परिक्षेस आवश्यक उर्वरित अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बार्टी, पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर तसेच ई- बार्टी ॲपमधील M-governance अंर्तगत ऑनलाईन “एमपीएससी मुख्य (Mains) परीक्षा ऑनलाईन कोचिंगसाठी प्रवेश अर्ज” या लिंकवर उपलब्ध आहेत.
या प्रशिक्षणाचा कालावधी जुलै 2021 पर्यंत असणार आहे. मार्गदर्शन वर्ग सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 ते 4 या वेळेत आयोजित केले जातील. तसेच शनिवार, रविवार व शासकीय सुट्टयांच्या दिवशी बंद राहतील. सदर ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचे फेसबुक पेज व बार्टीच्या “Barti Online” या यू ट्युब चॅनेलवरुन लाईव्ह-स्ट्रिमिंग करण्यात येत आहे, असे बार्टीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
