Monday, June 15, 2026
PUNE

गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यता देण्यासाठी डॉ. दिवाकर अभ्यंकर यांची सुवर्णपदक पुरस्कारासाठी देणगी


पुणे, दि. २५ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देत सुवर्णपदक पुरस्कारासाठी प्रा. डॉ. दिवाकर अभ्यंकर यांनी ३ लाख रुपयांची आर्थिक मदत अर्थात देणगी दिली आहे. हा धनादेश त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हाती सुपूर्त केला आहे.

जैव तंत्रज्ञान विषयातील २०२१-२२ दरम्यान उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात येणाऱ्या सुवर्णपदकासाठी ही आर्थिक मदत करण्यात आली आहे. डॉ. अभ्यंकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सुवर्णपदक पुरस्कारासाठी यंदा ७ व्यांदा आर्थिक मदत केली आहे. यापूर्वी ६ वेळा त्यांनी अर्थशास्त्र, व्यवस्थापन, फार्मा, विधी, भौतिकशास्त्र आणि संस्कृत या शाखांच्या सुवर्णपदकासाठी त्यांनी आर्थिक सहाय्य केले आहे.

डॉ. अभ्यंकर हे क्रेडाई महाराष्ट्र आणि पुण्याचे महासंचालक आहेत. ते एमसीसीआयचे माजी महासंचालक आहेत. या मदतीविषयी बोलताना डॉ. अभ्यंकर म्हणाले, “मी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. शंतनुराव किर्लोस्कर अध्यासनाचे प्रमुख म्हणून ५ वर्षे काम केले आहे. त्यामुळे माझ्या विद्यापीठाचे मी काही देणे लागतो, ही माझी सामाजिक जबाबदारी आहे असे मला वाटते.”

याशिवाय डॉ. अभ्यंकर यांनी कोविड-१९ च्या काळात नातवासोबत पोलीस विभागात अन्न व सॅनिटाझर वाटप केले असून त्यांच्या मूळ गावी मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे कार्यही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading