Monday, June 15, 2026
PUNE

मंदिर कोषाचे अथकपणे काम करणाऱ्या मोरेश्वर कुंटे यांचे निधन

पुणे :  लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसने दखल घेतलेल्या आणि मंदिर कोषाचे गेली २० वर्षे अथकपणे काम करणाºया मोरेश्वर कुंटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, ३ मूले, सुना आणि नातवंड असा परिवार आहे.


त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९३९ रोजी कºहाड येथे झाला. मोरेश्वर कुंटे आणि विजया मोरेश्वर कुंटे यांनी १८ नोव्हेंबर १९९१ पासून वानप्रस्थाश्रम स्विकारला. यात त्यांनी देवदर्शन घ्यायला सुरुवात केली पण ती वेगळ्या प्रकाराने.  एक-एक जिल्हा ठरवून त्यातील प्रत्येक शहरात, खेडेगावात जाऊन तेथील ऐतिहासिक माहिती, पूजेची पद्धत, सध्याची परिस्थिती याची माहिती घेऊन त्या मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण फोटो घेऊन त्यावर पुस्तक काढलेआणि मंदिर कोश रूपाने सादर केले. १९९१ पासून आजपर्यंत ३३ जिल्ह्यांतील १८ हजाराहून अधिक मंदिरे त्यांचे २५ हजाराहून अधिक फोटो व एम ८० या दुचाकीने १.१५ लाख किलोमीटरचा प्रवास केला असून या  विषयावर ४० पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या या कार्याची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसने दखल घेतली आह

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading