छत्रपती शिवाजी मार्केट आगीतील कामगिरीबद्दल कर्तव्य फाउंडेशनतर्फे अग्निशमन अधिकारी व जवानांचा सन्मान
पुणे- कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये लागलेली आग तत्काळ अटोक्यात आणून ऐतिहासिक वास्तूचे जतन केल्याबद्दल कर्तव्य फाउंडेशन तर्फे पुणे कॅन्टोन्मेंट व पुणे म.न.पा.च्या अग्निशमन दलातील अधिकारी व जवान यांचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
धोबीघाट येथे पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमास लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे,कॅन्टोन्मेंट अग्निशमन अधिक्षक प्रकाश हासबे, पुणे मनपा अग्निशमन स्टेशन ऑफीसर विजय भिलारे,प्रकाश गोरे,फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख, मोहसीन शेख ,दिलीप भिकुले,गणेश शेलार,सुनील बाथम आदी उपस्थित होते.
१३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये लागलेली पुणे कँन्टोन्मेंट व पुणे मनपाच्या अग्निशमन दलाने तत्काळ अटोक्यात आणून ऐतिहासिक वास्तूचे केलेले जतन कौतुकास्पद आहे असे मत यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी व्यक्त केले तर अग्निशमन दलातील जवानांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे शौर्य दाखविले ते कायम स्मरणात राहील असे मत संजय मोरे यांनी व्यक्त केले. कर्तव्य फाउंडेशनने कार्याची दखल घेऊन जो सन्मान केला त्याबद्दल कॅन्टोन्मेंट अग्निशमन अधिक्षक प्रकाश हासबे व पुणे मनपा अग्निशमन स्टेशन ऑफिसर प्रकाश गोरे यांनी आभार व्यक्त केले.फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार पाडले.
या कार्यक्रमात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अग्निशमन अधिक्षक प्रकाश हासबे ,पुणे मनपा अग्निशमन स्टेशन ऑफीसर विजय भिलारे,प्रकाश गोरे,तांडेल असीफ शेख, फायरमन प्रमोद चव्हाण, अनिल ताजणे, सचिन भगत,अजय इथापे,प्रसाद बोराटे,मनीष भोंबळे,निखिल जगताप,चालक बाळासाहेब धाकपाडे व जीवन जगताप यांचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
