सन्मित्र फाउंडेशनच्या वतीने जागतिक जल दिन साजरा

पुणे – सन्मित्र फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त नागपूर चाळ येथे “जल है तो कल है” हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. या जल अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुदीप गायकवाड राजकुमार बाफना, यशवंत शिर्के, किशोर भोंडे यावेळी उपस्थित होते विभागातील नागरिक मोठ्या संख्येने या जल अभियानास उपस्थित होते. “जल है तो कल है” हा संदेश सन्मित्र फाऊंडेशनचे संस्थापक किशोर चौरे यांनी यावेळी बोलताना जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांना दिला. सन्मित्र फाउंडेशन 2009 पासून पाणी वाचवणे व संवर्धन करणे बाबत सातत्याने जनजागृती व प्रबोधन करीत आहे. कार्यक्रमाचे आयोजन किशोर चौरे यांनी केले होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय आठवले यांनी केले.

दरम्यान, सन्मित्र फाउंडेशनच्यावतीने सन 2019 मध्ये येरवडा खुल्या कारागृहातील जुनी विहीर स्वच्छ करण्यात आली. दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या या विहिरीचा नादुरुस्त व जीर्ण भाग अर्धा पाडून संस्थेच्या वतीने काही देणगीदारांच्या मदतीने अवघ्या दीड लाख रुपयात विहिरीची पूर्ण दुरुस्ती करून ती पुनर्वापरात आणण्यात आली. त्यामुळे या विहिरीतील पाण्याचा योग्य वापर पुन्हा सुरू झाला. सन्मित्र फाउंडेशन च्या वतीने पाणी बचत, पाण्याचे महत्व तसेच या विषयावरील विविध प्रकल्प सातत्याने राबविण्यात येत असून भविष्यात आणखी काही उपक्रम राबविण्यात येणार भविष्यात आणखी काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. समाजातील जागरूक घटकांनी या महत्त्वपूर्ण विषयांमध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किशोर चौरे यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: