जागतिक जल दिनी रंगला ‘संवाद जलयोध्यांशी’
पुणे : जागतिक जल दिन ,जागतिक वन दिनाचे औचित्य साधून तेर पॉलिसी सेंटरने आयोजित केलेल्या ‘संवाद जलयोध्यांशी ‘या ऑनलाईन कार्यक्रमाला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला.
‘वॉटर फॉर पीपल ‘संस्थेचे राज्याचे उपक्रम प्रमुख हेमंत पिंजण ,वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट(पुणे ) मधील संशोधक अनुराधा फडतरे आणि ‘डिलोयट टच तोहमतसु इंडिया ‘ संस्थेचे सल्लागार डॉ शशिधर झा(पाटणा )हे जलयोद्धे या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले.
हा कार्यक्रम २२ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता झाला. तेर पॉलिसी सेंटर च्या संचालक डॉ विनिता आपटे यांनी प्रास्ताविक केले.
राजकुमारी सूर्यवंशी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
डॉ.विनिता आपटे म्हणाल्या,’ आपण शेतीवर ,जंगलावर आणि पाण्यावर अवलंबून आहोत. भविष्यात ते आपलयाला मिळणार नाही,असे संशोधन आहे.याची काळजी वाटते .पृथ्वीचे भवितव्य आपल्या हाती सुरक्षित असेल हे पाहणे आपली जबाबदारी आहे.पाणी प्रदूषित होणार नाही,हे पाहणे प्रत्येकाची जबादारी आहे.’
डॉ शशिधर झा म्हणाले,’ जंगल हे आपल्याला जीवनाशी आवश्यक सर्व गोष्टी देते.जंगलाची हानी होत असल्याने तापमान वाढ होत आहे.जंगल ही अतिशय संवेदनशील परिसंस्था आहे.त्यावर हवामान बदलाचा दुष्परिणाम होत आहे. जंगलाचे प्रमाण कमी होणे हा धोक्याचा इशारा आहे.जंगलाची उत्पादकता कमी होत आहे. जंगलाचे संवर्धन प्राधान्याने केले पाहिजे .समाजाचा सहभाग वाढविला पाहिजे.
हेमंत पिंजण यांनी राजस्थानातील जल संधारणाचे अनुभव सांगितले.’पाण्याच्या उपलब्धतेच्या पातळीच्या खाली आपण गेलो आहोत. भूजल कमी होत चालले आहे.सर्व संतांनी पाण्याचे महत्व सांगितले आहे,पण आपण गांभीर्याने घेतलेले नाही.पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जबाबदारीने वापर केला पाहिजे. पाण्याचे उपलब्धतेचे अंदाजपत्रक मांडून वापर ठरवला पाहिजे. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.अन्न सुरक्षिततेबरोबर पोषण होणाऱ्या पिकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
अनुराधा फडतरे म्हणाल्या,’पाण्याचे व्यवस्थापन आणि जल समस्येत महिलांना अधिक त्रास झेलावा लागतो.पाण्यासाठी श्रमदान करतानाही महिला पुढाकार घेताना आढळतात.पिकांची निवड करताना नगदी पिकांकडे पुरुषांचा ओढा अधिक असतो,असे निरीक्षण आहे. महिलांच्या या सजगतेच्या उपयोग करून जलसंर्धन केले पाहिजे.जलव्यवस्थापनात महिलांचा सहभाग वाढवला पाहिजे.