चिंता वाढली – राज्यात आज 30 हजार 535 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
मुंबई – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच, आज महाराष्ट्रात ३० हजार ५३५ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील मृत्यू दर २.१५ टक्के एवढा झाला आहे. आतापर्यंत राज्यात ५३ हजार ३९९ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज रोजी एकूण २ लाख १० हजार १२० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
आज ११ हजार ३१४ करोनातून बरे झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २२,१४,८६७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.३२ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर ९ हजार ६०१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.
मुंबईत मागील २४ तासांत ३ हजार ७७५ नवीन करोनाबाधित वाढले, दहा रूग्णांचा मृत्यू झाला. तर, १ हजार ६४७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख ६२ हजार ६५४ झाली आहे. आतापर्यंत ३ लाख २६ हजार ७०८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, आजपर्यंत ११ हजार ५८२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २३ हजार ४४८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
पुणे शहर ..!
- दिवसभरात 2900 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 1245 रुग्णांना डिस्चार्ज.
- 20 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
235394 - ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-22524
- एकूण मृत्यू – 5053
- एकूण डिस्चार्ज- 207817