भारतीय मानक ब्युरो अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध पुण्यात उद्रेक

पुणे : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आधीच व्यावसायिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या बॉटल्ड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निर्मिती व्यावसायिकांना चिरी मिरीसाठी वेठीस धरणाऱ्या भारतीय मानक ब्युरो अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध पुण्यात उद्रेक झाला आहे .

या धोरणाविरुद्ध ३ मार्च रोजी भारतीय मानक ब्युरोच्या पुणे कार्यालयात आंदोलन करणाऱ्या बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सदस्यांच्या व्यवसायाचे मानक परवाने रद्द करण्याच्या नोटिसा अधिकारी हेमंत आडे यांनी बजावल्या आहेत .तर या द्वेषमूलक कारवाईविरुद्ध न्यायालयात जाण्याबरोबर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन,पुणे बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पत्रकाद्वारे दिला आहे .भारतीय मानक ब्युरोच्या पुणे विभागातील १४ जिल्ह्यात ५०० लायसनधारक आहेत .

भारतीय मानक ब्युरो चे पुण्यातील प्रमुख हेमंत आडे यांच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध त्यांना निवेदन द्यायला गेलेल्या बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांना आडे यांनी परवाने रद्द करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत . १० मार्च रोजी प्रमुख ४ पदाधिकाऱ्यांना आलेल्या या नोटीस वयक्तिक आकसाने तसेच नियमबाह्य असल्याचे असोसिएशन चे अध्यक्ष विजयसिंह डुबल ,उपाध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. भारतीय मानक ब्युरो चे अधिकारी भ्रष्टाचार करीत असून त्याविषयी तक्रारी केल्याने चिडून जाऊन नोटिसांची कारवाई हेमंत आडे करीत आहेत .

भारतीय मानक ब्युरोचे खोटी स्टिकर लावून पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर विकले जात असल्याच्या आणि त्याविरुद्ध कारवाई करण्याच्या तक्रारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार केल्या होत्या .अनधिकृत स्टिकर वापरकर्त्यांची यादी दिली होती . त्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी हेमंत आडे हे परवाना धारक व्यावसायिकांना उलट नोटीस बजावत आहेत आणि परवाने रद्द करण्याची धमकी देत आहेत . यामागे त्यांचा हेतू स्वच्छ नाही ,असाही आरोप असोसिएशनने केला आहे .

मानक चिन्ह वापरण्यासाठी असलेल्या अटींचे पालन केलेले असताना देखील ब्युरो विरुद्ध तक्रारी केल्याने केवळ सूडाचा हेतू ठेवून व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत . याविरुद्ध न्यायालयात दाद मागितली आहे ,तसेच तीव्र आंदोलन करण्यात येईल ,असे विजयसिंह डुबल ,दत्तात्रय भरणे यांनी सांगितले .
असोसिएशन ने याआधीच सर्वोच्च न्यायालयात जाऊन अनधिकृत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निर्मिती प्लँट च्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश प्राप्त केलेले आहेत . तसेच अनधिकृत आयएसआय स्टिकर वापरणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात आघाडी उघडली आहे . मानक ब्युरो मात्र अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई न करता सनदशीर मार्गाने उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांच्या मागे हात धुवून लागले आहे .

Leave a Reply

%d bloggers like this: