लायन्स क्लब रिजन गंगाच्या वतीने संगम -एक अनुभूती कार्यक्रमांतर्गत २१ गरजू विद्यार्थीनींना मदत 

पुणे : लायन्स क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४ डि २ च्या रिजन गंगा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या लायन्स क्लबच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी २१ गरजू विद्यार्थीनींना सायकल देण्यात आल्या. तसेच कॅन्सर रुग्णांकरीता निधी देखील यावेळी गोळा करण्यात आला. 

रिजन गंगाच्या वतीने रिजन कॉन्फरन्स संगम -एक अनुभूती या कार्यक्रमाचे आयोजन बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे करण्यात आले होते. यावेळी २१ लायन्स क्लबने एकत्र येत ही मदत केली. प्रांतपाल अभय शास्त्री, उपप्रांतपाल हेमंत नाईक, राजेश कोठावडे,क्रिसलीस फाऊंडेशनचे मनिष गुप्ता, रिजन चेअरपर्सन रविंद्र गोलर तसेच काशिनाथ येनपुरे,आशिष मुजुमदार,  ज्ञानेश्वर थोरवे, फतेचंद रांका, हसमुख मेहता, रमेश शहा,राज मुछाल,ओमप्रकाश पेठे यावेळी उपस्थित होते. 

यावेळी मनिष गुप्ता यांनी लाईफ इन टॉप गिअर या विषयावर लोकांना मार्गदर्शन केले. तसेच अभय शास्त्री यांनी रिजन गंगा आणि त्या अंतर्गत येणाºया लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

रविंद्र गोलर म्हणाले, पुण्याजवळील बेलावडे, पिरंगुट या गावातील मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. शाळेत जाताना या मुली चालत जातात, त्यामुळे उन्हाळा, पावसाळ््यामध्ये त्यांना सोईचे व्हावे, म्हणून सायकल देण्यात आल्या. लायन्स क्लबच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना कशी मदत करता येईल, यादृष्टीने आम्ही सर्व क्लब मिळून काम करीत आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: