Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

खळबळजनक- ‘गृहमंत्र्यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले’- परमवीर सिंह

मुंबई, 20 – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत खळबळ उडवून दिली आहे. या पत्रातून परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी केला आहे.

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनीच असे गंभीर आरोप केल्यानंतर भाजपनेही सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘आता हे स्पष्ट झालं आहे की हे सरकार भ्रष्ट आहे,’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.

सध्या व्हायरल झालेल्या पत्रातील सातव्या मुद्द्यानुसार गृहमंत्र्यांनी वाझे आणि परमवीर सिंह यांना महिन्यांच टार्गेट दिलं होतं. हे कथित पत्र व्हायरल झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे.

सध्या भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही सोशल मीडियावर ठाकरे सरकारवर टीका केली आहे आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. त्यांनी ट्वीमध्ये म्हटलं आहे की, वाझे हे ठाकरे सरकारचा वसुली अधिकारी असल्याचा आरोप आता सिद्ध झाला आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading