Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – महाराष्ट्रात आज विक्रमी रुग्ण संख्या; 27 हजाराहून अधिक नवीन रुग्ण

मुंबई, – राज्यात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कालपेक्षा आज राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येने 25 हजारांचा टप्पा पार केला होता. त्यात गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने 27 हजारांचा टप्पा पार केला आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 24 तासांतील आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचं सांगितलं जात आहे.

आज राज्यातून 13588 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण 22,03,553 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.97 % एवढे झाले आहे. आज राज्यात 27,126 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 92 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.18 टक्के एवढा आहे.

पुणे शहर

  • दिवसभरात ३१११ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात १०९४ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत २१ रुग्णांचा मृत्यू. ५ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ५३८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २३२४९४.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०८८९.
  • एकूण मृत्यू -५०३३.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २०६५७२.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १४४८४.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading