पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, दि. २० – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत. तसेच आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते.

आता त्या पाठोपाठ पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे, “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या” असे ट्विट त्यांनी केले आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक बड्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, सतेज पाटील या सारख्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता त्या पाठोपाठ तरुण मंत्र्याला सुद्धा कोरोनाने घेरले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: