कोरोना – देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात

नवी दिल्ली – देशात सध्या सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत, अशी माहती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

देशात ९ फेब्रुवारीला सर्वात कमी नवी रुग्ण आढळून आले होते. आता दर आठवड्याला कोरोनाचे ४३ टक्के वाढ नवीन रुग्णांमध्ये दिसून येत आहे. तर कोरोना मृत्यूचा आकडाही वाढत असून आठवड्याला ३७ टक्के वाढ होत आहे. कोरोनाने देशातील मृत्यूदर हा २ टक्क्यांच्या खाली आहे. पण काही राज्यांमध्ये कोरोनाने होणाऱ्या मृत्यूत मोठी वाढ दिसून येत आहे, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.

देशातील १६ राज्यांमधील ७० जिल्ह्यांमध्ये गेल्या १५ दिवसांत कोरोनाचे रुग्णांची संख्या १५० टक्क्याने वाढली आहे. कर्नाटमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह दर हा १.३ टक्के आहे. तर पंजाबमध्ये ६.८ टक्के आहे. पंजाबमधील रुग्णांमध्ये होणारी वेगाने वाढ चिंता वाढवणारी आहे. यामुळे सर्व राज्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. कोरोनाच्या चाचण्या, संपर्कात येणाऱ्यांचा शोध आणि रुग्णांवरील उपचारांवर अधिक भर देण्याची गरज असल्याचं आवाहन राज्यांना केल्याचं, राजेश भूषण म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या संवादात वाया जाणाऱ्या लसींच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे, असं डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. युरोपीय देशांसह एकूण १० देशांनी अॅट्राझेनकाच्या लसीच्या वापरावर बंदी घातली आहे. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण हा निर्णय खबरदारी म्हणून घेण्यात आला आहे. यासंबंधी अद्याप कुठलीही पडताणली करण्यात आलेली नाही असं युरोपीय मेडिकल एजन्सीने म्हटल्याचं पॉल यांनी सांगितलं.

अॅस्ट्राझेनकाच्या करोना लसीबाबत तक्रारींच्या मुद्द्यावर भारत सतर्क आहे. यासंदर्भात आवश्यक माहिती गोळा केली जात आहे. पण अशा प्रकारची देशात कुठलाही घटना समोर आलेली नाही, असं पॉल यांनी अॅस्ट्राझेनकाच्या करोना लसीबाबत उत्तर दिलं.

Leave a Reply

%d bloggers like this: