सचिन वाझे यांना अटक, NIA ची कारवाई

मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ही कारवाई केली आहे. एनआयएने सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अटक केली आहे. एनआयए / एमएमआय कलम कलम २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२० बी अंतर्गत आयपीसी आणि ४ (a) (b) (I) स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. वाझे यांना शनिवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी NIA पथकाने चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. वाझे यांच्या सोबत एसीपी अलुकनुरे, एटीएसचे एसीपी श्रीपाद काळे यांना NIA ने चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर रात्री उशिरा काळे आणि अलुकनुरे यांचा जवाब घेऊन त्यांना जाऊ देण्यात आले होते. मात्र सचिन वाझे यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर रात्री उशिरा वाझे याना अटक करण्यात आली आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाझे यांना अद्याप हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: