कोरोना लसीकरण सहायता केंद्राचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : शिवाजीनगरमध्ये भाजपचे पहिले कोरोना लसीकरण नाव नोंदणी सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले आहे. भांडारकर रस्त्यावरील साने डेअरी चौक येथील या केंद्राचे उद्घाटन आमदार व पुणे भाजपा प्रवक्ते सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी पुणे शहर भाजप सरचिटणीस दत्तात्रय खाडे, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष योगेश बाचल, शिवाजीनगर भाजप मतदारसंघ अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, मतदारसंघ सरचिटणीस प्रतुल जागडे, गणेश बगाडे,  रमेश गिरमकर, योगेश जोगळेकर, दिनेश अंबुरे,सुनील पांडे उपस्थित होते. 

सुनील पांडे म्हणाले, कोरोनाची लस घेताना ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले आहे. लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांना नोंदणीचे अधिकृत पत्र देखील दिले. या कोरोना लसीकरण नाव नोंदणी सहाय्यता योजना केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  

Leave a Reply

%d bloggers like this: