भारताची डिजिटल स्थित्यंतर कथा–एक वृद्धी विरोधाभास?

‘विनिंग इन द डिजिटल एज : सेव्हन बिल्डींग ब्लॉक्स ऑफ सक्सेसफुल डिजिटल ट्रान्स्फर्मेशन’ हे  नितीन सेठ यांनी लिहिलेले पुस्तक ॲमेझॉनवर बेस्ट सेलर पुस्तक ठरले आहे. ‘क्वाट्रो’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (आणि ‘नॅसकॉम’चे माजी अध्यक्ष) श्री रमण रॉय; अर्थ क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व श्री लिओ पुरी; ‘एब्ल्यूएस इंडिया अँड साउथ एशिया’चे अध्यक्ष श्री पुनीत चंडोक आणि ‘वन चॅम्पियनशिप’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चात्री सित्योडटोंग हे उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चासत्रासाठी एकत्र आले होते. ‘डिजिटल पॉवरहाऊस म्हणून जगात नेतृत्व करण्याच्या बाबतीत भारताचे भवितव्य’ या विषयावर या मान्यवरांमध्ये आज चर्चासत्र झडले.

लेखकाने नोंदविलेल्या मतानुसार, “आम्ही डिजिटल युगाच्या प्राथमिक टप्प्यावर असून तो आपल्या वर्तमान काळातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्या माध्यमातून एकूण समाजाला, उद्योगांना आणि धाडसी लोकांना एक अभूतपूर्व अशी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही त्या माध्यमातून आत्तापर्यंत अप्राप्त असलेल्या क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळवू शकता किंवा त्यात अपयशी ठरू शकता. कारण टेस्ला, अॅमॅझॉन आणि झूम या डिजिटल क्षेत्रातील स्थानिक कंपन्या आधीच खूप पुढे निघून गेल्या आहेत. त्यांनी डिजिटल युगामध्ये व्यवसायाचे नवनवीन नियम याआधीच आत्मसात करत त्यांचा अवलंभ केला आहे.

भारतासाठी डिजिटल युग हे देशाच्या प्रगतीसाठी आणि आपल्या अनोख्या अशा परिस्थितींचा उपयोग करून जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण काळ आहे. देशात दरवर्षी २.८ दशलक्ष अभियंते हे पदवी प्राप्त करतात, येथील ब्रॉडबँडची उपलब्धता अगदी स्वस्तः आहे, मोबाईल उपकरणे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांकडून वापरली जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथे माहितीचे लोकशाहीकरण झालेले आहे. त्या माध्यमातून लाखो वंचित लोकांपर्यंत ज्ञानाचा प्रवाह सहजपणे पोहचू शकतो आणि त्यांना इतर वेळी उपलब्ध नसलेलल्या संधी सहज प्राप्त होऊ शकतात.”

त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, सध्या भारत हा एका वेगळ्या अशा विरोधाभासाला समोरा जात आहे, कारण सर्व मूलभूत गोष्टी उपलब्ध असूनही येथील वृद्धी कुंठित झाली आहे. कोविड साथरोगामुळे एकूणच आर्थिक वृद्धीवर त्याचा परिणाम झाला असला तरी नियामक संस्थांमुळे एक प्रकारचा अडथळा निर्माण झाला असून त्याचबरोबर पुरेशा पायाभूत सुविधांचा येथे अभाव आहे. तसेच संस्थात्मक स्तरावर तयारीची वानवा असून डिजिटल स्थित्यंतराच्या संधींचा फायदा घेण्यात आपण कमी पडलो आहोत. या पुस्तकातील मूलभूत तत्त्वांचा वापर करून भारत आपली उद्यमशील ऊर्जा पुढे आणू शकतो आणि ‘व्हीयूसीए’ (व्होलटाईल, अनसर्टन, कॉम्प्लेक्स आणि अॅम्बीग्युअस) जगतामध्ये एक निर्णायक विजेता ठरू शकतो. या पुस्तकामध्ये व्यवसायाचे आठ नवीन नियम सांगितले गेले असून त्यांचा वापर कोणताही उद्योग ‘दुहेरी गतीच्या अंमलबजावणी’बरोबर करू शकतो. त्या माध्यमातून या संस्था डिजिटल युगामध्ये विजेत्या ठरू शकतात.

आघाडीच्या उद्योग अधिकारी आणि व्यावसायिकांसाठी जे कौशल्य आवश्यक आहे त्यांचा संदर्भ देत या पुस्तकामध्ये नितीन यांनी दुहेरी गोष्टींवरील प्रभुत्वाची गरज ही निरंतर अशा विरोधाभासाशी सामना करताना आवश्यक असल्याचे म्हटले आहे. वृद्धी विरुद्ध नफा, अल्पकालीन विरुद्ध दीर्घकालीन, धोरण विरुद्ध अंमलबजावणी यांसारख्या घटकांचा विचार करत ‘व्हीयूसीए’चे जगतामध्ये ही वृद्धी साध्य करता येते, असेही त्यांनी म्हटले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: