टाटा स्काय क्लासिक सिनेमा सादर करत आहेत बॉलिवुडच्या लोकप्रिय प्रेमकथा!

सध्या आधुनिक काळातील अनेक प्रेमकथा दिसतात. पण, क्लासिक प्रेमकथाही यात टिकून आहेत. टाटा स्काय क्लासिक सिनेमावर शेमारू एंटरटेनमेंट लि.च्या साह्याने बॉलिवुडमधील काही लोकप्रिय जोडप्यांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या प्रेमकथा दाखवल्या जाणार आहेत. अमिताभ आणि जया बच्चन ते आशा भोसले आणि आर डी बर्मन अशा अनेक जोडप्यांच्या कथा क्लासिक लव्ह स्टोरीज या नव्या शोमध्ये पाहता येतील. भारतीय टेलिव्हिजनवरील काही पॉवर कपल्स या प्रेमकथांच्या स्मृतींना नव्याने जिवंत करणार आहेत.

मानव गोहिल आणि श्वेता कवात्रा, रोहित रॉय आणि मानसी जोशी रॉय, गुरदीप कोहली आणि अर्जुन पुंज, गौतम रोडे आणि पंखुडी अवस्थी आणि वरुण बडोला आणि राजेश्वरी सचदेव गतकाळातील या प्रेमकथांना मूर्त स्वरूप देतील. या सीरिजमध्ये ऋषी आणि नीतू कपूर, अमिताभ आणि जया बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी, सुनील आणि नर्गिस दत्त, दिलीप कुमार आणि सायरा बानो, देव आनंद आणि कल्पना कार्तिक, राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया, जावेद अख्तर आणि शबाना आझमी, आशा भोसले आणि आर डी बर्मन आणि गुरुदत्त आणि गीता दत्त अशा क्लासिक बॉलिवुड जोडप्यांच्या प्रेमकथा आहेत.

या शोबद्दल मानव गोहिल म्हणाला, “मी या शोबद्दल फार उत्सुक होतो. यात मला श्वेतासोबत काम करता येणार होतं आणि ती सोबत असली की चित्रिकरणाचा सगळा काळ मी निश्चिंत असतो. आम्ही इतर बॉलिवुड कपलच्या कथा सांगत असलो तरी चित्रिकरणात आमच्या आठवणींनाही उजाळा मिळाला. आम्हाला दोघांनाही शो होस्ट करण्याची आवड असल्याने या कथा सांगताना मजा आली.”

या शोचा भाग असलेला गौतम रोडे म्हणाला, “माझ्या पत्नीसोबत या कथा सांगणे हे आजवरच एक सगळ्यात छान काम होतं. पंखुडीसोबत काम करायला मला आवडतं. पण फक्त ती माझी पत्नी आहे म्हणून नाही तर मला ती अभिनेत्री म्हणूनही आवडते. तिच्यासोबत काम करताना मजा येते आणि त्यातून सेटवर फार सकारात्मक वातावरण असतं.”

Leave a Reply

%d bloggers like this: