आझम कॅम्पस मध्ये पथनाट्य आणि जागृती मोहीम 

पुणे, दि. ९ – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस ) मध्ये महिला दिनानिमित्त अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल मध्ये शिक्षिकांनी ‘जिनेके बहाने’ हे पथनाट्य सादर केले. लेखन,दिग्दर्शन दिलशाद आसिफ यांचे होते.शाहीन शेख यांनी आभार मानले.

 आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षा से ना रुके’ ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी वापरलेले  मोबाईल ,डिजिटल टॅब अशी सामग्री गरजूनादान करण्याचे आवाहन करण्यात आले.प्राचार्य डॉ शैला बूटवाला,प्रा.एम जी मुल्ला,डॉ फरझाना शेख,प्रा.रईसा शेख,प्रा.उझमा सरखोत,प्रा.निकिता पांढरे उपस्थित होते. 
‘पै परवाझ’ डिव्हिजन मध्ये व्यायाम विषयक प्रात्यक्षिके दाखवून अंताक्षरी,संगीत खुर्ची,खो खो हे खेळ खेळण्यात आले.मुमताज सय्यद ,राजेंद्र पवार उपस्थित होते. 

इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) यांच्यातर्फे डॉ. व्ही. एन. जगताप यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. रुबी हॉलक्लिनिक च्या ब्रेस्ट सर्जन डॉ. स्वाती सुराडकर  यांनी परिपूर्ण आहार व ब्रेस्ट कॅन्सर या बद्दल जागरूकता निर्माण केली.डॉ.मंदार रानडे यांनी  महिलांच्या निरोगी आयुष्यासाठी वेळीच पीसीओडी वर उपचार करून पुढील आयुष्य कसे सुखकर करावे याबद्दल सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: