अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिक, दि. ७ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात २६ मार्च ते २८ मार्च रोजी होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे जाहीर केला आहे.

संपूर्ण भारतातून येणाऱ्या साहित्यिकांसह निमंत्रित लेखक- कवी यांच्या सुरक्षतेचा विचार करून हा निर्णय संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ नाशिकच्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगांवकर यांच्याशी चर्चा करून घेतला आहे.साहित्य संमेलन जरी स्थगित करण्याचा निर्णय घेतला असला तरी संमेलनाचे अध्यक्ष मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: