PMP डॉ. राजेंद्र जगताप व शंकर पवार यांचा स्वच्छता विभागातर्फे सत्कार

पुणे, दि. ४ – पीएमपीएमएलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणेसाठी संचालक मंडळाची मान्यता घेतल्याबद्दल पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप व संचालक शंकर पवार यांचा पीएमपीएमएल चे स्वच्छता विभागाकडील सर्व सफाई कामगार व स्वीपर सेवकांमार्फत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास महिला सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पीएमपीएमएल चे स्वच्छता विभाग प्रमुख नितीन वांबुरे, प्रशासन अधिकारी नितीन घोगरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

%d bloggers like this: