कोरोना – राज्यात आज १० हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद

पुणे शहरात ८३० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई, दि.५ – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आज राज्यात तब्बल १० हजार २१६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वाधिक वाढ म्हटली जात आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार २१६ रुग्णांची वाढ तर ६ हजार ४६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण २० लाख ५५ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात ८८ हजारर ८३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.

पुणे शहर

  • दिवसभरात 830 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 551 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 5 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
    206383
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-6160
  • एकूण मृत्यू – 4881
  • एकूण डिस्चार्ज- 195342

Leave a Reply

%d bloggers like this: