Wednesday, June 17, 2026
PUNE

अहमदाबादच्या आयेशा च्या आत्महत्येबद्दल पुण्यातील ‘जमियत उलेमा हिंद ‘ कडून दुःख व्यक्त

पुणे, दि. ४ – अहमदाबादच्या आयेशा अरिफ खान या विवाहितेने पतीला व्हिडीओ पाठवून केलेल्या आत्महत्येबद्दल पुण्यातील ‘जमियत उलेमा हिंद ‘ कडून दुःख व्यक्त केले आहे . या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून सासरकडून मागितलेल्या हुंड्याला,पैसे आणि वस्तूंच्या लालसेला ‘शरियत ‘मध्ये स्थान नाही ,उलट तो गुन्हा समजला जातो असा निर्वाळा ‘जमियत उलेमा -ई -हिंद ‘चे पुणे जिल्हाध्यक्ष हाफिज महम्मद किफायतुल्लाह यांनी दिला आहे . गुरुवारी त्यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले असून शुक्रवारच्या नमाज मध्ये उलेमांनी साधेपणाने विवाहाचा आग्रह धरणे , सासरकडून हुंडा ,पैसे आणि वस्तूंच्या लालसेला शरियत मध्ये स्थान नसल्याबाबत जनजागृती करावी ,असे आवाहन केले आहे.

या घटनेला धार्मिक रंग देऊ नये . स्त्री ला सर्व धर्मात त्रास दिला जातोय तो थांबायला हवा ,अशा घटना सर्व ठिकाणी घडतात. लग्नानंतर विवाहितांनी एकमेकांच्या भावना समजावून घेऊन वैवाहिक जीवन सुखी करावे ,लग्नात मोठेपणाचा देखावा करू नये ,असे आवाहनही ‘जमियत उलेमा -ई -हिंद ‘च्या इसलाहे मुआशरा (समाज सुधारणा) समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष एडव्होकेट समीर शेख यांनी या पत्रकाद्वारे केले आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading