कोकण महामार्ग कामाच्या गतीसंदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट

पुणे, दि. ४ – कोकण हायवे तातडीने पूर्ण होण्या संदर्भात कोकण हायवे समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट
घेतली. कोकण महामार्ग समितीचे अध्यक्ष संजय यादवराव, ग्लोबल कोकण चे संचालक किशोर धारिया, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उद्योजक दीपक परब
उपस्थित होते

कोकण हायवे कृती समितीच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्य सचिव द.म. सुकथनकर यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे तज्ञ मंडळ यशवंत पंडित यांच्या समन्वयातून, मंगेश नेने, संतोष ठाकूर, प्रसाद पटवर्धन, युयुत्सु आर्ते, जगदीश ठोसर, व अन्य कार्यकर्त्यांच्या मदतीने बनवलेला कोकण हायवे चा अभ्यास अहवाल गडकरी यांना सुपूर्द केला.

यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या हायवेवर अनेक अडचणी आहेत , अपघात होतील अशी अनेक धोकादायक ठिकाणे आणि वळणे आहेत. अनेक नाक्यावर भरपूर ट्राफिक आहे, पण सर्विस रोड किंवा वाहने
पलीकडे जाण्यासाठी अंडरपास नाहीत, पळस्पे ते इंदापूर 85 किलो मीटर चे काम आणि त्यापुढील
आरवली ते वाकड हे जवळपास 90 किलोमीटरचे काम अतिशय अपूर्ण स्थितीत आहेत या सर्व मुद्द्यांची चर्चा केली.

देशाचे माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी या अहवालासंदर्भात या अगोदर नितीन गडकरी यांच्यासमवेत चर्चा केली होती.

समितीच्या सर्व सूचनांचे नितीन गडकरी यांनी स्वागत केले. सकारात्मक चर्चा झाली. या संपूर्ण अहवालाचा अभ्यास करून सर्व मुद्दे एकत्रितपणे मंत्री महोदयांकडे द्यावेत अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात आले.

समितीच्या मुद्द्यांचा अभ्यास करण्याकरता अधिकार्‍यांची एक टीम कोकणात येऊन सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिल व यात जे जे शक्य आहे ते सर्व केले जाईल अशा स्वरूपाचे आश्वासन गडकरी यांनी कोकण हायवे समन्वय समितीला दिले.

अभ्यास गटाच्या वतीने अजून काही मुद्दे तपशीलवार देणार आहोत. ग्लोबल कोकण चे स्वागत अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी या संदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे, असे संजय यादवराव यांनी सांगितले.कोकण हायवे अधिकाधिक दर्जेदार व्हावा यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचे कोकण हायवे समन्वय समितीने ठरवले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित द पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना येत्या कालावधीत भेटणार आहोत. या संदर्भात एक रचनात्मक अभियान सुरू केले आहे, आपणा सर्वांचा यात सकारात्मक सहभाग मिळत आहे, असे यादवराव यांनी सांगीतले. कोकणची सर्वात अनमोल भेट हापूस आंबा

आणि आंबा बागायतदारांचा आंतरराष्ट्रीय ब्रँड
मायको हापुस या आंब्याची एक पेटी शिष्टमंडळाच्या वतीने गडकरी यांना भेट दिली. यावेळी रायगड जिल्ह्यातून ग्लोबल कोकण चे संचालक किशोर धारिया, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उद्योजक दीपक परब उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: