वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

मुंबई, दि. 4 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते. टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून निर्माण झालेल्या वादामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.

Leave a Reply

%d bloggers like this: