महिला दिनी  संवाद ‘वन  रागिणींशी’ ! ‘तेर पॉलिसी सेंटर’ चा उपक्रम  

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त ‘ तेर पॉलिसी सेंटर ‘ या पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या वतीने  महाराष्ट्रातील जंगल वाचविण्याच्या कामात योगदान देणाऱ्या वन विभाग कर्मचारी  महिलांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ८ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता  ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम होणार असून ‘संवाद वन  रागिणींशी ‘ असे या उपक्रमाचे नाव आहे.या महिला वन विभाग कर्मचाऱ्यांचा आव्हानात्मक आणि प्रेरणात्मक प्रवास या संवाद कार्यक्रमातून ऐकायला मिळणार आहे ल. 

प्रणाली चव्हाण (रेंज फॉरेस्ट ऑफिसर ,चंद्रपूर ), गीता बेलपत्रे (फायर फ्री फॉरेस्ट मिशन ,मेळघाट टायगर रिझर्व्ह ), स्मृती उपाध्याय (फॉरेस्ट गार्ड, बांधवगड टायगर  रिझर्व्ह ), राणी गौड (मेळघाट टायगर रिझर्व्ह ), लक्ष्मी मेरावी (कान्हा टायगर रिझर्व्ह ), प्रिया वरेकर (वाईल्ड लाईफ रिसर्चर ,कान्हा टायगर रिझर्व्ह ) या महिला वन विभाग कर्मचारी या संवाद कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

‘ तेर पॉलिसी सेंटर ‘ च्या संचालक डॉ. विनीता आपटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.झूम मिटिंग द्वारे होणाऱ्या या संवाद कार्यक्रमात https://us02web.zoom.us/j/85682570554 या लिंक द्वारे सहभागी होता येईल . 856 8257 0554 हा मिटिंग आय डी आहे .

Leave a Reply

%d bloggers like this: