‘मौका-ए-वारदात’मध्ये मनोज तिवारी, रवी किशन आणि सपना चौधरी
आपण व गुन्हेगारी विश्वामध्ये फक्त एकच फरक आहे, तो म्हणजे शक्य व अशक्य. आपण विचार करत असलेल्या अशक्य गोष्टी गुन्हेगारी विश्वामध्ये शक्य आहेत. आपल्यासमोर अशक्य गुन्ह्यांच्या कथा सादर होतात, तेव्हा अशा कथा आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात की हे कसे घडू शकते? तुमच्या कल्पनाशक्तीला आव्हान करणा-या आणि तुम्हाला अबोल करणा-या अशक्य गुन्ह्यांच्या असाधारण कथा घेऊन येत आहे एण्ड टीव्हीवरील नवीन लक्षेवधक साप्ताहिक क्राइम मालिका ‘मौका-ए-वारदात’.
‘मौका-ए-वारदात’ रहस्यमय गुन्हेगारी प्रकरणांना दाखवेल, जी प्रेक्षकांच्या मनाला विचलित करतील आणि त्यांना ‘वास्तविकता काल्पनिकतेपेक्षाही विलक्षण असते’ या वक्तव्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल. मालिकेमध्ये मनोज तिवारी, रवी किशन व सपना चौधरी सर्वात अकल्पनीय गुन्ह्यांची झलक दाखवतील. रवीराज क्रिएशन्स, हेमंत प्रभु स्टुडिओज, एअॅण्डआय प्रॉडक्शन्स आणि स्पेसवॉकर फिल्म्स निर्मित ‘मौका-ए-वारदात’ सुरू होत आहे ९ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता फक्त एण्ड टीव्हीवर आणि दर सोमवार ते शुक्रवार प्रसारित होईल.
अस्सल ठिकाणांच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘मौका-ए-वारदात’ मालिका सर्वात अकल्पनीय गुन्ह्यांच्या विविध कथांना सादर करेल आणि त्यामागील दृष्टिकोन व गुन्हेपद्धतींना दाखवेल. प्रत्येक कथा प्रबळ साप्ताहिक एपिसोडने भरलेली असेल. या मालिकेमध्ये मुख्य भूमिका महिलेची आहे, जी विलक्षण गुन्ह्यांमागील रहस्यांचा उलगडा करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल. ही मालिका एक संकलन आहे, ज्यामध्ये वास्तविक घटनांमधून प्रेरित सर्वात रोमांचक व रहस्यमय गुन्हेगारी कथांचा समावेश आहे. ज्यामधून प्रेक्षकांना सर्वात अनपेक्षित घटनांसह रोमांचपूर्ण अनुभव मिळेल.
या नवीन मालिकेबाबत बोलताना एण्ड टीव्हीचे व्यवसाय प्रमुख विष्णू शंकर म्हणाले, ”क्राइम मालिकांमध्ये नेहमीच एक विशिष्टता राहिली आहे. हे कोणी केले? किंवा यामागील हेतू काय होता? अशा रहस्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्यांदाच आम्ही अशा प्रकारची मालिका सादर करत आहोत, जी सर्वात विलक्षण व अशक्य गुन्ह्यांना दाखवते, जे सर्व तर्कांना खंडित करतील आणि प्रेक्षकांना कोण किंवा का, पण कसे? हा गुन्हा कसा शक्य आहे? हा गुन्हा करण्यामध्ये कशाप्रकारे यशस्वी झाले? असे प्रश्न विचारण्यास भाग पाडतील. आम्हाला एण्ड टीव्हीवर लक्षवेधक साप्ताहिक क्राइम मालिका ‘मौका-ए-वारदात’ सादर करण्याचा आनंद होत आहे. वास्तविक जीवनातील घटनांमधून प्रेरित या काल्पनिक कथा प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला आव्हान करतील.”
मनोज तिवारी म्हणाला, ”मला या मालिकेचा भाग होण्याचा आनंद होत आहे. गुन्हा अत्यंत भयानक आहे आणि अनेकदा आपल्या जीवनातील अनियंत्रित असा भाग आहे. गुन्हा घडतो तेव्हा सर्वांना धक्का बसतो. सर्वांमध्ये गुन्ह्यामागील हेतू, गुन्हा का घडला व कसा घडला हे जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण होते. पण ‘मौका-ए-वारदात’ ही मालिका कल्पनेपलीकडील असून विश्वासापलीकडे असलेल्या गुन्ह्यातील रहस्यांना सादर करते आणि लोकांना विचार करण्यास भाग पाडते की ‘हे असे कसे झाले?’ रवी किशन म्हणाला, ”दररोज आपण आसपास अनेक गुन्हे घडल्याचे वाचतो किंवा त्याबाबत ऐकायला मिळते. अशा घटना निश्चितच त्रासदायक आहेत, पण काही घटना धक्कादायक व आश्चर्यचकित करतात. त्यामधील दुष्टपणासोबत प्रश्न पडतो की असा अशक्य गुन्हा कसा घडला? मी विविध मालिकांचा भाग राहिलो आहे, पण ‘मौका-ए-वारदात’ची संकल्पना सर्वात अविश्वसनीय गुन्ह्यांच्या लक्षवेधक कथांमुळे पूर्णत: नवीन आहे.” सपना चौधरी म्हणाली, ”मौका-ए-वारदात मालिकेमध्ये प्रमुख महिला पात्राच्या दृष्टिकोनातून कथाकथन करण्यात आले आहे, जी या मालिकेबाबत मला लक्षणीय बाब वाटली. हे पात्र या अकल्पनीय गुन्ह्यांमागील रहस्यांचा उलगडा करेल, जी या मालिकेची खासियत आहे आणि मालिका पाहण्यासाठी रोमांचक बाब आहे.”
रवीराज क्रिएशन्सचे निर्माता व दिग्दर्शक रवीराज महतो म्हणाले, ”क्राइम मालिकेचा विचार केल्यास कथेच्या संकल्पनेपासून व्हिज्युअलायझेशनपर्यंत प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. ‘मौका-ए-वारदात’साठी निवडण्यात आलेल्या कथा सर्वात रोमांचक व रहस्यमय वास्तविक जीवनातील घटनांमधून प्रेरित आहेत. या कथा प्रेक्षकांच्या संवदेनशीलतेला आव्हान करतील आणि घटनांच्या सर्वात अनपेक्षित प्रसंगांसह त्यांना रोमांचक अनुभव देतील.”
हेमंत प्रभु स्टुडिओजचे निर्माता व दिग्दर्शक हेमंत प्रभु म्हणाले, ”मालिका ‘मौका-ए-वारदात’ अविश्वसनीय गुन्हे व लक्षवेधक कथानकांच्या अद्वितीय संकल्पनेमुळे सर्वश्रेष्ठ ठरते. प्रत्येक एपिसोड मानवी भावनांच्या गडद बाजूला दाखवेल, गुन्हा कसा घडला या बाबीवर भर देईल आणि अनेक ट्विस्ट सादर करेल. ज्यामुळे प्रेक्षक निश्चितच अचंबित होतील आणि त्यांच्यामध्ये पुढील एपिसोडबाबत उत्सुकता लागून राहिल.” एअॅण्डआय प्रॉडक्शन्सचे निर्माता शैजू नायर म्हणाले, ”प्रेक्षकांना रहस्याच्या घटकासह रोमांचक कन्टेन्ट आवडतात. त्यांना रोमांच व रहस्याच्या अनोख्या राइडवर घेऊन जाणार आहे एण्ड टीव्हीवरील मालिका ‘मौका-ए-वारदात’. आम्ही अनेक महिन्यांपासून विविध कथांच्या बाबतीत सखोल संशोधन केले आहे. आम्ही आता सर्वात काल्पनिक व रोमांचपूर्ण गुन्हेगारी रहस्य सादर करण्यास सज्ज आहोत, जे प्रेक्षकांचे मन विचलित करतील.”
