श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गजानन विजय ग्रंथाचे ऑनलाईन पठण

पुणे : शेगावचे श्री संत गजानन महाराज यांच्या ५ मार्च या “प्रकट दिन” दिनानिमित्त त्यांची महती सांगणाऱ्या ‘गजानन विजय ‘ ग्रंथाचे ऑनलाईन पठण यू ट्यूब द्वारे उपलब्ध करण्याचा उपक्रम पुण्यातील भाविक प्रमोदकुमार तिवाटणे यांनी केला आहे .

मराठी भाषेतील “श्री गजानन विजय ” चे पठण आता यू ट्यूब या संकेतस्थळावर करण्यात आले असून असुन sgvg marathi असे शोधल्यास भाविकांना त्वरित पाहता येणार आहे. https://youtu.be/HgPCokD0NHc या लिंकवर अध्याय उपलब्ध करण्यात आला आहे .

या ग्रंथाचे पठण भोसरी, पुणे येथील शिक्षक व कीर्तनकार महेश देशपांडे यांच्या मदतीने करण्यात आले आहे. ग्रंथाचे पठण व श्रवण भाविकांना सहजरीत्या करता येणार आहे. शेगाव येथे दर्शन रांगेतसुद्धा याचा उपयोग होणार आहे,असे प्रमोदकुमार तिवाटणे यांनी सांगितले.

प्रकटदिनाच्या निमित्ताने “श्री गजानन विजय ” या ग्रंथाचे पारायण भाविक करीत असतात .मात्र ,वृद्धापकाळ किंवा अन्य कारणाने वाचू न शकणाऱ्या भाविकांना हा ग्रंथ यू ट्यूब माध्यमावर श्रवण करता येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: