Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

विधिमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कृषिपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडू नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २ : शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषिपंप आणि ग्राहकांची  वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीज थकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading