सोनालीका ट्रॅक्टर्सचा नवा विक्रम  

 देशांतर्गत १ लाख ट्रॅक्टरची विक्री तर ११ महिन्यातील उच्चांकी ट्रॅक्टर विक्रीची नोंद   

 पुणे , दि. २ –  भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या ट्रॅक्टर ब्रँड सोनालिकाने फेब्रुवारी’२१ मध्ये ११,८२१ ट्रॅक्टर्सची विक्री केली असून फेब्रुवारी’२० मध्ये हा आकडा ९,६५० होता.  आर्थिक वर्ष’२१ मध्ये सर्वाधिकस मासिक वाढ नोंदविण्याचा ट्रेंड कायम ठेवत सोनालिका ट्रॅक्टर्सने या वर्षीच्या ११ महिन्यांमध्ये १,०६,४३२ ट्रॅक्टर्सची देशांतर्गत एकत्रित विक्रीचा उच्चांक गाठला असून मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ३५.५ टक्के अधिक व्यवसाय वृद्धी नोंदविली आहे. अन्य सर्व ट्रॅक्टर ब्रँड्सच्या तुलनेत सोनालिकाने सर्वाधिक गतीने एक लाख ट्रॅक्टर्सची विक्री बाजारात केली आहे.  

जगभरातील १३० देशांमध्ये दखल घेण्याजोगे अस्तित्व असलेल्या सोनालिकाने प्रगत बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाला समाविष्ट करून घेत त्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण भारतीय बाजारपेठेत परवडणाऱ्या दरात केले आहे. सोनालिकाच्या संशोधन व विकास विभागाने सातत्याने परिश्रम करून अद्ययावत व अत्याधुनिक ट्रॅक्टर्सची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांकडून आलेल्या अभिप्रायावर आधारित आणि त्यांच्या पिक व भौगोलिक गरजांनुसार या ट्रॅक्टर्सची निर्मिती करण्यात आली आहे. प्रदेशानुसार आपली धोरणे विकसित करण्यावर भर देतानाच, सोनालिकाने २०२१ मध्ये क्रांतीकारी उत्पादने बाजारात सादर करण्यासाठी जागतिक दर्जाच्या व सर्वोत्कृष्ट अशा आपल्या व्हर्टिकली इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये सर्व सोयी निर्माण केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कंपनी आपल्या नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे करते. त्यामुळे जगभरामध्ये कृषी क्रांतीचे नेतृत्व करण्याच्या उद्दिष्टाकडे कंपनीची वाटचाल सुरू आहे. 

 सोनालिका ग्रुपचे कार्यकारी संचालक , रमण मित्तल  म्हणाले   भारतीय बाजारपेठेतील अन्य कोणत्याही ट्रॅक्टर ब्रँडच्या स्थापनेपासूनच्या तुलनेत सर्वाधिक गतीने देशांतर्गत एक लाख ट्रॅक्टर्सची विक्री करणारी सोनालिका ही एकमेव कंपनी ठरली आहे. त्यातून शेतकऱ्यांनी सोनालिकावर दाखविलेला विश्वास अधोरेखित होत आहे. आर्थिक वर्ष’२१ मध्ये दर महिन्याला सोनालिकाने सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर्सचे ठराविक कालावधीनंतर बाजारातील सादरीकरणाचे धोरणामुळे हे यश मिळाले आहे.”

  भारतीय शेतकरी त्यांच्या शेतातील विविध प्रकारच्या गरजा पूरण करण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी स्मार्ट शेतीचे तंत्र अवलंब करण्यासाठी उत्सुक आहेत. भारतातील देशांतर्गत बाजारपेठेचा कल आता अधिक एचपी ट्रॅक्टर्सकडे दिसून येत आहे. बाजारातील बदलत्या गरजांची आम्हाला पूर्ण जाणीव असून भारतात क्रांतीकारी ट्रॅक्टर्स आणण्याचा ट्रेंड आम्ही कायम ठेवू. त्यामुळे शेती यांत्रिकीकरणाद्वारे होणारा देशाचा विकास अधिक वेगाने होईल.” शेती यांत्रिकीकरणाला वेगाने चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सोनालिका कंपनी कटिबद्ध आहे. ट्रॅक्टरच्या २० ते १२० एचपी रेंजमधील हेवी ड्युटी प्रोडक्ट पोर्टफोलियोचे उत्पादन सोनालिकाच्या होशियारपूर येथील कारखान्यात होत आहे. रोबोटिक्स आणि आॅटोमेशनच्या मदतीने उच्च दर्जाची उत्पादने उत्पादित करण्यासाठी हा कारखाना सुसज्ज आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: