Saturday, May 30, 2026
PUNE

‘स्वरमंडल फाऊंडेशन’ तर्फे ‘संगीत संगोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. २ – ‘स्वरमंडल फाऊंडेशन’ व भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ‘संगीत संगोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम शनिवार, दि. ६ व रविवार दि. ७ मार्च रोजी कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. कस्तुरी पायगुडे-राणे यांनी दिली. कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी नियम व सूचनांचे काटेकोर पालन कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे पायगुडे यांनी सांगितले. संगीताचा प्रचार, प्रसार या उद्देशाने नव्यानेच सुरू झालेल्या ‘स्वरमंडल फाऊंडेशन’चा हा शुभारंभाचा कार्यक्रम असून याचे उद्घाटन दि. ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ गायक स्व. पं. चिंतुबुवा म्हैसकर व स्व. पं. रत्नाकर पै यांच्या शिष्या जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका शाल्मली जोशी यांचे गायन होणार आहे. यावेळी त्यांचे पुत्र तेजोवृष जोशी (तबला) व मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम) हे साथसंगत करणार आहेत. यावेळी जोशी यांच्याशी पायगुडे संवाद साधणार आहेत.

रविवारी (दि. ७) सायंकाळी ५ वाजता शास्त्रीय गायक आदित्य खांडवे यांचे गायन होणार असून त्यांना अजिंक्य जोशी (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) हे साथसंगत करणार आहेत. त्यानंतर पं. अनंत तेरदल हे कन्नड रचना पेश करतील. यावेळी त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), आनंद टाकळकर (टाळ) हे साथसंगत करणार आहेत. यावेळी पं. अनंत तेरदल यांच्याशी डॉ. कस्तुरी पायगुडे-राणे संवाद साधतील. या दोन दिवसाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन आनंद देशमुख करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading