दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जी क्लास”गुरुजी वर्ल्ड’कडून अभ्यासाची गुरुकिल्ली सादर

पुणे: कोविडमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. विशेषतः छोट्या शहरांमधील विद्यार्थ्यांवर, दहावीच्या विदयार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेची तयारी करताना अडचणी येत आहेत. पालक वर्गामध्ये ही काळजीचे सूर उमटत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता गुरुजी वर्ल्डने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जी क्लास’ या त्यांच्या अद्ययावत अ‍ॅपमध्येहे व्यापक मॉड्यूल तयार केले आहे. 

या मॉड्यूलमध्ये चाचण्या, वर्कशीट आणि व्हिडिओचा समावेश आहे. २५ टक्के कमी झालेल्या अभ्यासक्रमाला अनुसरून आणि पेपर पॅटर्नमधील बदल लक्षात घेऊन हे मॉड्युल तयार करण्यात आले आहे, या मॉड्युलद्वारे विद्यार्थ्यांना सगळ्या संकल्पना समजून घेता येईल. ही त्यांचासाठी आम्ही गुरुकिल्ली तयार केली आहे. अशी माहिती गुरुजी वर्ल्ड टेक्नोलॉजीज प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश प्रभू यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी संचालक संजीवनी प्रभू, कंटेंट प्रमुख कल्याणी भानोसे, अथर्व प्रभू उपस्थित होते.

बर्‍याच पालक आणि विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्न आणि अभ्यासक्रमाविषयी पुरेशी माहिती नाही आहे. आमच्या काही विद्यार्थी आणि पालकांसोबत आम्ही चर्चा केली. सगळेच जण चिंतेत असल्याचे आम्हाला जाणवले म्हणून आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे मॉड्यूल तयार केले. या ॲपविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ०२२ ६८४६१७६८ या क्रमांकावर विद्यार्थी आणि पालक संपर्क करू शकतील. आमचे शिक्षण ‘कॉऊन्सेलर’  त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना मदत करतील,असेही त्यांनी सांगितले.   

‘जी क्लास’ हे गुरुजी वर्ल्डने विकसित केलेले ई-लर्निंग अ‍ॅप आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या संकल्पनेने मार्च २०२० मध्ये अँड्रॉइड फोन / टॅबलेट वापरणाऱ्यांसाठी हे तयार केले. सोप्या पद्धतीने डिजिटल शिक्षण घेण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: