‘तुझं माझं जमतंय’च्या सेटवर ‘पार्टी हो रही है!!!’

झी युवावरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली तुझं माझं जमतंय ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. नुकतंच या मालिकेत प्रतिक्षा जाधवची एंट्री झाली आणि प्रतिक्षा पम्मी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मालिकेतील अनेक ट्विस्ट्स आणि टर्न्स प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवत आहेत. पण साध्य या मालिकेच्या सेटवर ‘पार्टी हो राही है!!!’ आणि निमित्त आहे मालिकेने गाठलेला १०० भागांचा टप्पा.प्रेक्षकांचं भरगोस प्रेम आणि पाठिंबा मिळवून पाहता पाहता या मालिकेने १०० भागांचा टप्पा गाठला आहे.

या मालिकेतील आशु, पम्मी आणि शुभू या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. या मालिकेचा पहिला मैलाचा दगड म्हणजे १०० भागांचा यशस्वी प्रवास आणि हा आनंद सेटवर संपूर्ण टीमने केक कापून साजरा केला. यावेळी मालिकेतील अभिनेता रोशन विचारे याने सध्या सोशल मीडियावर चालत असलेल्या ‘पार्टी हो राही है’ या ट्रेंडला अनुसरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. “यह हम है, यह हमारी टीम है, और यह पार्टी हो राही है”, असं म्हणत एकच जल्लोष करत या टीमने आपला आनंद केक कपात साजरा केला. केकने सगळ्यांचं तोंड गोड करून असंच प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करण्यासाठी ही टीम सज्ज झाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: