९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन गाळ्यांसाठी आणि प्रतिनिधींसाठी २३ फेब्रुवारी पासून नोंदणी सुरु

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६, २७ आणि २८ मार्च, २०२० रोजी नाशिक येथे होत आहे. या संमेलनात प्रकाशकांना व पुस्तकविक्रेत्यांना ग्रंथ प्रदर्शनात गाळा / गाळे मिळण्यासाठीचे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात सकाळी ९ ते १२ या वेळेत उपलब्ध आहेत.

गाळे आरक्षणासाठी नोंदणी शुल्क रु. ६५००/- आहे. गाळ्यासाठी नोंदणी २२ फेब्रुवारी २०२१ पासून ते दि. १५ मार्च, २०२१ पर्यंत रोख शुल्कासह किंवा डी. डी. स्वरूपात जमा करायची आहे. ग्रंथप्रदर्शनाच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास स्वागत मंडळाचे श्री जयप्रकाश जातेगावकर (९८२२०५६९१६), वसंतराव खैरनार (९४२२२५७११७), पंकज क्षेमकल्याणी (९४२२२५२२०८) आणि सुनिताराजे पवार (९८२३०६८२९२) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ज्या साहित्यप्रेमींना  संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे आहे.  त्यांच्यासाठी (रु. ३०००/- तीन दिवस निवासासहित भोजन व  नाष्टा) असे प्रतिनिधी शुल्क आकारण्यात येणार  आहे. तरी ज्या गाळे धारकांना किंवा प्रतिनिधींना नोंदणी करायची  असेल त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेत वरील वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: