‘एनईसीसी एन्डयुरो’, ‘ट्रेल रन’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – साहसाची संधी आणि फिटनेसची परीक्षा घेणाऱ्या ‘एनईसीसी एन्डयुरो’ आणि ‘ट्रेल रन’ या स्पर्धांच्या नावनोंदणीला शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘एनईसीसी एन्डयुरो’ ही स्पर्धा 6 आणि 7 मार्च रोजी होणार आहे. नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित या स्पर्धेचे यंदा 19 वे वर्ष आहे. सुरक्षेचे सर्व नियम पाळून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 21 फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धांसाठी नाव नोंदणी करता येणार आहे.

‘माणिकचंद ऑक्सिरिच’ चे विशेष सहकार्य लाभलेल्या यंदा स्पर्धेच्या माध्यमातून ‘कोविड वॉरियर्स’ च्या कार्याला सलाम तसेच मदत दिली जाणार आहे. साहसी खेळांच्या सार्थक क्षेत्रात सातत्याने सुरू असणारा स्पर्धात्मक उपक्रम हे ‘एनईसीसी एन्डयुरो’ चे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक विभागात किमान तीन स्पर्धक आणि त्यात एका मुलीचा समावेश असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर दोन स्पर्धक आणि सोलो स्पर्धक असेही विभाग करण्यात आलेले आहेत.

फिटनेस प्रेमींसाठी ‘एनईसीसी एनईएफ ट्रेल रन’ चे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठीही अनेकांनी नाव नोंदणी केली आहे. ट्रेल मध्ये 15 आणि 25 किलोमीटर असे दोन गट असणार आहेत या ट्रेल रन साठी प्रवेश मर्यादित आहेत. ट्रेल रन या उपक्रमाचे आयोजनही सुरक्षेचे सर्व नियम आणि अटी पाळून करण्यात येणार आहे. खास सायकल प्रेमींना डोंगरातल्या रस्त्यांवर सायकल चालविण्याचा अनुभव घेण्याची संधी या स्पर्धेत मिळणार आहे, त्यासाठी वेगळा गट करण्यात आला असून त्यासाठीचे अंतर 70 किलोमीटर आहे. स्पर्धेच्या ठिकाणीही नियम व अटींचे काटेकोर पालन करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती ‘एनईएफ’चे संचालक प्रसाद पुरंदरे यांनी दिली असून अधिक माहितीसाठी 8698656565 किंवा http://www.nefenduro.com या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: