‘वसंतोत्सव विमर्श’ ह्या उपक्रमात ‘कानडा काफिला’

पुणे, दि. १५ – डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘वसंतोत्सव’ यंदा डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षपूर्ती सोहळा म्हणून आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या महोत्सवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ‘कानडा काफिला’ हा विशेष कार्यक्रम ‘वसंतोत्सव विमर्श’ अंतर्गत होणार आहे. गुरुवार दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं. ५:३० ते ९ या वेळेत, ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग येथे कार्यक्रम होणार आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे.  

महोत्सवात डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतींना उजाळा देताना रसिकांना यंदा वैविध्यपूर्ण संगीताची मेजवानी मिळणार आहे. महोत्सवाचे हे सलग १४ वे वर्ष असून महोत्सव दि. १९ ते २१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान होणार आहे.

‘वसंतोत्सव विमर्श’ ह्या उपक्रमाविषयी डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू व प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे म्हणाले, “दर वर्षी संगीतविषयक सप्रयोग व्याख्यान वा कार्यशाळा ‘वसंतोत्सव विमर्श’ मध्ये आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी ‘कानडा काफिला’ हा विशेष कार्यक्रम ‘विमर्श’ अंतर्गत होणार आहे. कोरोनाविषयक आवश्यक सुरक्षा काळजी बाळगत सर्व संगीत विद्यार्थी, कलाकार व रसिक यांना येथे मुक्त प्रवेश आहे.”

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात राग कानडाचे विविध प्रकार, कानडा अंगाचे राग यावर डॉ चैतन्य कुंटे सप्रयोग विवरण करतील. तर दुसऱ्या सत्रात जयपूर घराण्याचे बुजुर्ग गायक पं. सुधीर पोटे हे कानडा रागाच्या विविध प्रकारांची, खानदानी बंदिशींची प्रस्तुती करतील. त्यांना मिलिंद पोटे (तबला) व सौमित्र क्षीरसागर (हार्मोनिअम) हे साथसांगत करतील.

Leave a Reply

%d bloggers like this: