Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

पुणे, दि. 15 – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी (दि.15) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 91 वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

अतिशय कडक शिस्तीचे न्यायाधीश अशी पी. बी. सावंत यांची ओळख होती. अनेक महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल त्यांनी दिला होता. पुण्यात भरवण्यात आलेली पहिली एल्गार परिषद त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.

30 जून 1930 रोजी पी. बी. सावंत यांचा जन्म झाला होता. मुंबई विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) मिळवली होती. मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाता त्यांनी वकिली केली. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी त्यांच्या कार्यकाळात झाली. 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आलं होतं.

दरम्यान, तत्कालीन मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पी. बी. सावंत अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. 23 फेब्रुवारी 2005 रोजी आपला अहवाल सादर केला होता, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते, परंतु विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केलं गेले. त्यांच्या अहवालामुळेच सुरेश जैन आणि नवाब मलिक यांनी राजीनामा दिला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading