पुणेकरांनी पाहिला दुर्मिळ रेडिओचा खजिना

जागतिक रेडिओ दिनी रंगला ‘रेडिओ उत्सव’; प्रदर्शन, तज्ज्ञांची व्याख्याने आणि प्रात्यक्षिकेही

पुणे : ६०-७० च्या दशकातील लाकडी रेडिओ, एसी/डीसी, ट्रान्झिस्टर, एएम, एफएम, ऍनॉलॉग रेडिओ, फ्रिक्वेन्सी बँड रेडिओ, क्रिस्टल सेट, फिलिप्स प्रेस्टिज रेडिओ अशा जुन्या दुर्मिळ रेडिओचा खजिना पुणेकरांनी शनिवारी पहिला. निमित्त होते, जागतिक रेडिओ दिनाचे औचित्य साधून रंगलेल्या रेडिओ उत्सवाचे!
पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, हौशी रेडिओ परवाना धारक, मुक्तांगण विज्ञान शोधवाटिका केंद्र, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स, पद्मिनी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल कॉलनीतील मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रात आयोजित उत्सवात दुर्मिळ रेडिओचे प्रदर्शन मांडले होते. रेडिओ संग्राहक श्रीपाद कुलकर्णी यांच्या संग्रहातील जवळपास ५० रेडिओ येथे मांडण्यात आले होते.

या रेडिओ प्रदर्शनाचे उद्घाटन फिलिप्स प्रेस्टीज रेडिओचे डिझायनर श्रीरंग गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. स्वतःच्या हाताने डिझाइन केलेल्या रेडिओला पाहून श्रीरंग गोखले भावूक झाले. रेडिओ दिवसानिमित्त पुण्यातील हॅम विलास रबडे माहिती दिली. ‘रेडिओ : काल, आज व उद्या’वर विश्वास काळे, ‘एस डी आर रेडिओची रचना आणि विकास’ वर डॉ. विश्वास उडपीकर, ‘रेडिओ ऐकणे माझा छंद’वर दिलीप बापट प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना माहिती दिली. रेडिओवर प्रश्नमंजुषा स्पर्धाही झाली. आकाशवाणीच्या ‘डीआरएम’ या नवीन प्रक्षेपण तंत्राबद्द्ल सहसंचालिका चित्ररेखा कुलकर्णी यांनी सादरीकरण केले.


रेडिओ ‘कॉमनमॅन’चा आवाज : श्रीरंग गोखले
जागतिक रेडिओ दिनी आयोजित रेडिओ उत्सवात जुन्या दुर्मिळ रेडिओ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना श्रीरंग गोखले म्हणाले, “रेडिओ हा कॉमनमॅनचा आवाज आहे. एकेकाळी हाच रेडिओ सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. एकटेपणात कित्येकांचा साथी होता. फिलिप्समध्ये रुजू झालो, तेव्हा रेडिओ कोण विकत घेईल? असे वाटे. पण उत्तम रेडिओ तयार झाले आणि लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ३५ वर्षांहून अधिक रेडिओच्या निर्मितीत काम केले. रेडिओची रचना बदलली; मात्र रेडिओची लोकप्रियता आजही तशीच आहे. अनंत भिडे म्हणाले की, आज मनोरंजनाची विविध माध्यम असूनही, रेडिओला अजूनही महत्त्व आहे. त्याचे स्वरुप बदलले. मात्र, आजही लोक काम करताना, गाडी चालवताना रेडिओ ऐकतात. 

Leave a Reply

%d bloggers like this: