सरकारचा निषेध करीत ऐतिहासिक लाल महालात घुमला पोवाड्याचा आवाज

पुणे :  महाराष्ट्र शासनाने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच शिवजयंती उत्सवात पोवाड्याच्या कार्यक्रमाला देखील बंदी घातली, या आदेशा विरोधात महाराष्ट्रातील तमाम शाहीरांच्या वतीने शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या नेतृत्वाखाली ज्या राजमातेने शाहीराला प्रोत्साहन दिले त्या राजमाता जिजाबाईंच्या साक्षीने ऐतिहासिक लालमहालात पोवाडयाचा आवाज घुमला.  

यावेळी शाहीर हेमंत मावळे, प्रा. संगिता मावळे, शाहीर महादेव जाधव, राजकुमार गायकवाड, अरुणकुमार बाभुळगावकर, सुरेश तरलगट्टी, युवा शाहीर होनराज मावळे, मुकुंद कोंडे, शाहीर श्रीकांत शिर्के,देवराव कांबळे आदी उपस्थित होते. शाहीर हेमंत मावळे आणि सहकाºयांनी यावेळी पोवाडा सादर करुन निषेध नोंदविला. 

शाहीर हेमंत मावळे म्हणाले, ठाकरे सरकारने बीअर बार, हॉटेल्स यांना परवानगी दिली. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील सुरु झाले आहेत परंतु शिवजयंती उत्सवात पोवाडे गाण्यावर बंदी का घातली जात आहे. शिवजयंती उत्सवात पोवाडा नाही गायचा तर केव्हा गायचा, अशी भावना मावळे यांनी व्यक्त केली. त्यामुळे शिवरायांचे बालपण ज्या ठिकाणी गेले त्या लाल महालात पोवाडा सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: