Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

यापुढे काँग्रेसच महाराष्ट्राच्या सत्तेत राहील, नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई – विधानसभेच्या सभापती पदाचा राजीनामा देऊन नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रॅली काढली. मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान नाना पटोले यांनी ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यापुुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी देशाच्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश देत आहोत,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानादेखील १०० रुपयांपर्यंत दर गेले आहेत. देशातील जनतेची लूट सुरु आहे तसंच महागाई त्याविरोधातही आम्हाला संदेश द्यायचा आहे,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

“मी परवा नागपुरात होतो. नागपुरातही परिवर्तनाची लाट दिसली. महाराष्ट्रात आज जी लाट दिसत आहे ती केंद्रातील हुकूमशाही सरकारविरोधातील परिवर्तनाची लाट आहे. मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात ‘चले जाव’ ची घोषणा आम्ही देणार आहोत,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. “काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. पुढं काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार,” असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading