fbpx
Monday, June 17, 2024
Business

सुप्रीमचे दर्जेदार पाईप्स व फिटिंग पुण्यात उपलब्ध

पुणे, दि. १२ – दर्जेदार पीव्हीसी, युपीव्हीसी, सीपीव्हीसी पाईप्सचे उत्पादन करणारी जळगांव येथील सुप्रीम इंड्रस्टीज लि. चे सर्व प्रकारचे पाईप्स व फिटींग आता पुण्यात न्यू पाईप एजन्सीजच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशी माहिती न्यू पाईप एजन्सीजचे संचालक राकेश मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी राकेश मित्तल सहित सुप्रीमचे प्रतिनिधी मनोज कळसाईत, एचपीचे प्रविण देशमुख उपस्थित हेाते. पुढे राकेश मित्तल म्हणाले की, अनेक वर्षापासून आम्ही प्लबिंग मटेरियल क्षेत्रात असून होलसेल मध्ये सर्व प्रकारचे  प्लबिंग मटेरियल पुणे, सातारा, अहमदनगर औरंगाबाद येथील व्यापार्‍यांना पुरविण्याचे काम करतो. 1942 पासून भारतासह 25 देशात पाईप्स व फिटींग मटेरियल विक्री करणारी विश्‍वसनीय जळगाव येथील सुप्रीम इंडस्ट्रीज लि.चे उत्पादन आता पुणे शहर, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव रांजणगाव, वाघोली, मंचर व संपुर्ण ग्रामीण भागात न्यू पाईप एजन्सीजच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. सुप्रीम इंडस्ट्रीजने न्यू पाईप ऐजन्सीजला अधिकृत डिस्ट्रीब्यूटरशीप प्रदान केली असल्याची माहितीही मित्तल यांनी दिली. सुप्रीम इंड्रस्टीज अधिक माहिती देताना मनोज कळसाईत  म्हणाले की, आमचे देश भरात 27 प्लांट आहेत. कंपनीचा 9 हजार कोटीचा वार्षिक उलाढाल आहे. आमचे सर्व उत्पादन सुमारे 55 देशात निर्यात केले जाते. दर वर्षी 200 नवीन प्रोडक्ट बाजारात सादर करित असतात.

सुप्रीम सोबतच एचपी अ‍ॅडेसीव्हचे ही आम्ही अधिकृत विक्रेते आहोत. एचपीचे सॉल्वेंट सिंमेंट सीलीकॉन सिमेंट, एफआरपी मेनहोल कव्हर, बॉल व्हाल आमच्या माध्यमातून पुणे शहरातच्या बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच आम्ही ही नाईस ब्रॅड ने बाथरूम फिटिंगचे विविध उत्पादन करून विक्री करतो. त्याप्रमाणे आमच्या एजन्सीजच्या माध्यमातून सुप्रीम, प्लास्टो व इतर सर्व दर्जदार कंपन्याचे पाण्याची प्लास्टीक टाकी आमच्या येथे उपलब्ध आहेत. सोलार वॉटर हीटरसाठी काईटेक कंपनीचे पाईप फिटींग पुणे, सातारा, अहमदनगर व औरंगाबाद मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading