पूजा चव्हाण आत्महत्या – ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ

पुणे, दि. १२ – मूळची बीड जिल्ह्यातील परळी येथील २३ वर्षीय पूजा चव्हाण शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला आली होती. ती आपला चुलत भाऊ आणि त्याच्या एका मित्रासोबत हडपसर परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीमध्ये राहात होती. याच सोसायटीत तीने आत्महत्या केली.पूजाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आता या प्रकरणाशी संबंधित एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.दरम्यान,या प्रकरणाची चौकशी करा म्हणून भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना निवेदनही दिलं आहे.

या ऑडिओमध्ये एक व्यक्ती ‘ती आत्महत्या करणार आहे’ असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असे देखील ती म्हणत आहे. त्यामुळे संभाषण करणाऱ्या दोन व्यक्ती कोण आहेत असा देखील यानिमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आणि विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या संबंधाच्या पैलूची देखील सोशल मिडीयावर चागलीच चर्चा आहे. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचं नाव जोडलं जात असल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: